आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Zydus Cadila's Corona Vaccine Trial Almost Complete, Expected To Start Vaccination By The End Of July Or In August

बालकांसाठी लवकरच लस:जायडस कॅडिलाच्या कोरोना व्हॅक्सीनची ट्रायल जवळपास पूर्ण, एक महिन्यानंतर सुरू होऊ शकते लसीकरण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या शिक्षणाचे बरेच नुकसान झाले आहे, म्हणून शाळा उघडणे आवश्यक आहे

देशात कोरोनाच्या डेल्टा + व्हेरिएंटचे वाढते प्रकरण आणि संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांवर जास्त परीणाम होणार असल्याचे वृत्त आहे. असे असताना त्यांच्यासाठी लसीकरणाची तयारी वेगाने सुरू आहे. सध्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन, फायजर आणि जायडस कॅडिलाची लस मंजूरी मिळवण्यापासून खूप जवळ आहे.

कोविड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ. एनके अरोरा यांनी रविवारी सांगितले की जायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी जवळजवळ पूर्ण झाली आहे. जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टमध्ये आम्ही 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांने लसीकरण सुरू करू शकतो.

दररोज एक कोटी डोस करण्याचे लक्ष्य आहे
ते म्हणाले की, ICMR एक अभ्यास घेऊन आला आहे. त्यात सांगितले आहे की तिसरी लाट उशीरा येण्याची शक्यता आहे. आपल्याकडे देशातील प्रत्येकास लसीकरण करण्यासाठी 6-8 महिने आहेत. येत्या काही दिवसांमध्ये दररोज 1 कोटी डोस देण्याचे आमचे लक्ष्य आहे.

एम्स चीफ म्हणाले, लस आल्यामुळे मुलांसाठी शाळा सुरू करता येतील
एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांचे म्हणणे आहे की मुलांसाठी कोरोना लस येणे ही एक मैलाचा दगड मिळवण्यासारखे यश असेल. यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याचा आणि मैदानी उपक्रम पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. गुलेरिया यांनी शनिवारी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना हे सांगितले.

बालकांसाठी तीन लसी

  • 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकच्या कोवाक्सिनच्या फेज 2 आणि 3 चाचणींचा निकाल सप्टेंबरपर्यंत अपेक्षित आहे. औषध नियामकांकडून मान्यता मिळाल्यानंतर मुलांसाठी लस भारतात येऊ शकेल.
  • फायझरची लस यापूर्वी मंजूर झाल्यास, मुलांसाठी हा देखील एक पर्याय असू शकतो.
  • एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जायडस कॅडिलाही लवकरच आपली कोरोना व्हॅक्सीन ZyCoV-D च्या आपत्कालिन वापराच्या मंजुरीसाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाजवळ अप्लाय करु शकते. कंपनीचा दावा आहे की, ही लस वयस्कर आणि बालके दोघांनाही दिली जाऊ शकते.

मुलांच्या शिक्षणाचे बरेच नुकसान झाले आहे, म्हणून शाळा उघडणे आवश्यक आहे
डॉ. गुलेरिया म्हणाले की जायडस लस मंजूर झाल्यास आपल्याकडे आणखी एक पर्याय असेल. बहुतेक मुलांमध्ये सौम्य संसर्ग होण्याची शक्यता असते आणि काहीजणांमध्ये लक्षणे देखील दिसत नाहीत. पण, ते संसर्गाचे वाहक असू शकतात.

ते म्हणाले की, साथीच्या आजारामुळे गेल्या दीड वर्षात अभ्यासाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शाळा पुन्हा सुरू कराव्या लागतील. लसीकरण यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. हा साथीचा रोग टाळण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे.

मुलांसाठी 25 ते 26 कोटी डोस आवश्यक आहेत
मुलांमध्ये कोरोना संसर्गाचा आढावा घेण्यासाठी, साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी आणि त्यासाठीची तयारी बळकट करण्यासाठी एक राष्ट्रीय तज्ञ गट तयार केला गेला आहे. मुलांना लसी देण्याच्या विषयावर निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल यांनी अलीकडेच सांगितले की हा गट छोटा नाही. माझ्या अंदाजानुसार 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची संख्या सुमारे 13 ते 14 कोटी आहे. यासाठी आपल्याला 25-26 कोटी डोसची आवश्यकता असेल.

सरकारने अलीकडेच असा इशारा दिला आहे की अद्यापपर्यंत कोरोनाचा मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, तरीही व्हायरसच्या व्यवहारात बदल झाला तर अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते. अशा कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...