आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या सुईमुक्त लसीचा पुरवठा सुरू:सध्या महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये केला जाणार वापर, झायडस कॅडिला 358 रुपयांमध्ये देणार ZyCoV-D चा एक डोस

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी ZyCoV-D या आणखी एका लसचा पुरवठा सुरू झाला आहे. विशेष बाब म्हणजे ही लस सुईमुक्त आहे, म्हणजेच ती लावण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची सुई टोचण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही. मात्र, आतापर्यंत बाजारात आलेल्या इतर कोरोना लसींप्रमाणे दोन नव्हे तर तीन डोस देण्यात येणार आहे. अशी ही जगातील पहिली लस आहे, जी डीएनए आधारित आणि सुईमुक्त आहे.

अहमदाबादमधील झायडस कॅडिला या औषध कंपनीने ही लस तयार केली आहे. बुधवारपासून कंपनीने केंद्र सरकारला पुरवठा सुरू केला. सध्या केंद्र सरकारने त्याचे 1 कोटी डोस ऑर्डर केले आहेत. ही लस अशा लोकांना दिली जाईल ज्यांना आतापर्यंत कोणत्याही लसीचा एकही डोस मिळालेला नाही.

उत्तर प्रदेश, बिहार आणि पंजाबसह 7 राज्यांना पुरवठा झाला सुरू
कंपनीने केंद्र सरकार तसेच सात राज्यांना ZyCOV-D लसीचा पुरवठा सुरू केला आहे. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, पंजाब आणि झारखंड यांचा समावेश आहे.

कंपनी लवकरच ते खुल्या बाजारातही मेडिकल स्टोअरमध्ये विक्रीसाठी आणणार आहे. त्याची किंमत 265 रुपये ठेवण्यात आली आहे, तर अ‍ॅप्लिकेटर (ही लस टोचण्यासाठी उपकरण) 93 रुपयांना स्वतंत्रपणे खरेदी करावी लागेल. अशा प्रकारे, त्याची एकूण किंमत 358 रुपये असेल.

अशा प्रकारे सुईशिवाय Zydus Cadila ची ZyCOV-D लस दिली जाईल.
अशा प्रकारे सुईशिवाय Zydus Cadila ची ZyCOV-D लस दिली जाईल.

12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे ही लस
सध्या, ZyCoV-D फक्त सात राज्यांतील लोकांसाठी असेल. अशा प्रकारची ही पहिली लस आहे, जिला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने 12 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी मान्यता दिली आहे. DCGI ने ऑगस्ट 2021 मध्ये देशातील 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पहिली अँटी-कोरोनाव्हायरस लस म्हणून आपत्कालीन वापरास मान्यता दिली. नंतर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनलाही मुलांसाठी वापरण्याची परवानगी देण्यात आली.

Zydus ने 28 हजार स्वयंसेवकांवर या लसीची चाचणी केली होती. या चाचणीच्या निकालांच्या आधारे, कंपनीने दावा केला आहे की कोरोनाविरूद्धच्या या लसीचा परिणाम 66.60% झाला आहे.

28 दिवसांच्या अंतराने 3 डोस घ्यावे लागणार
ZyCoV-D चे तीन डोस घ्यावे लागणार. हे तीन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातील म्हणजेच पहिला डोस आणि तिसरा डोस यामध्ये 56 दिवसांचे अंतर असेल. ते 2-8 अंश तापमानात साठवले जाऊ शकते. कंपनीची वार्षिक 10 ते 12 कोटी डोस तयार करण्याची योजना आहे.

हा जेट ऍप्लिकेटर आहे, जो लस देण्यासाठी वापरला जातो.
हा जेट ऍप्लिकेटर आहे, जो लस देण्यासाठी वापरला जातो.

ही लस सामान्य सिरिंजने नव्हे तर जेट ऍप्लिकेटरच्या मदतीने दिली जाईल
ZyCoV-D चा डोस नेहमीच्या लस सिरिंजऐवजी डिस्पोजेबल जेट ऍप्लिकेटर किंवा फार्मा जेट इंजेक्टर वापरून दिला जाईल. हे एक यंत्र आहे जे स्टेपलरच्या डिझाइनचे आहे. जेट इंजेक्टर अमेरिकेत सर्वात जास्त वापरले जाते. यामुळे उच्च दाबाखाली लस लोकांच्या त्वचेत टोचली जाऊ शकते. त्याचवेळी, सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या सुईचे इंजेक्शन, द्रव किंवा औषध स्नायूंमध्ये जाते. जेट इंजेक्टरमध्ये दाबासाठी कॉम्प्रेस्ड गॅस किंवा स्प्रिंग्स वापरतात.

जेट इंजेक्टरसह लस टोचण्याचे काय फायदे?
पहिला फायदा असा आहे की, ते इंजेक्शन देणाऱ्या व्यक्तीला वेदना कमी करते, कारण ते सामान्य इंजेक्शनप्रमाणे तुमच्या स्नायूमध्ये जात नाही. दुसरा फायदा म्हणजे संसर्ग पसरण्याचा धोका सुईच्या इंजेक्शनपेक्षा खूपच कमी असतो.

बातम्या आणखी आहेत...