आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा1. कादंबऱ्या वाचा : लेखक, न्यूरोलॉजिस्ट डॉ. रिचर्ड रेस्टॅक आपल्या नवीन पुस्तकात लिहितात की, अधिकाधिक कादंबऱ्या वाचल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. कादंबरीतील विविध पात्रे आणि प्रसंग आपल्याला लक्षात ठेवावे लागतात, म्हणून ही एक प्रभावी पद्धत आहे. 2. चिंता लिहून काढा ः रात्रीच्या वेळी विचारांत गुरफटण्याऐवजी भीती, चिंता लिहून काढण्यासाठी दिवसा थोडा वेळ द्या, असे मानसशास्त्रज्ञ डॉ. एरिक प्राथर म्हणतात. त्या वेळी समस्या सोडवण्यावर किंवा समजून घेण्याऐवजी फक्त त्या लिहा आणि चांगली झोप घ्या. 3. रागाचे व्यवस्थापन ः पत्रकार कॅथरीन पियर्सन लिहितात की, राग दाबण्याऐवजी तो व्यक्त करण्याची ताकद मिळवा. रागाचा तुमच्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या. रागाला संतुलित प्रतिसाद शिकणे हे आयुष्यभराचे कौशल्य आहे. 4. शारीरिक संतुलन तपासा ः शारीरिक संतुलन आणि मन-शरीर समन्वय आवश्यक आहे. दीर्घायुष्यासाठी हे संतुलन असणे आवश्यक आहे. वय ६० वर्षांपेक्षा जास्त असेल तर घरी बॅलन्स टेस्ट करून पाहू शकता. 5. आजार लपवू नका ः कोविड-१९ ने आपल्याला स्पष्ट संवादाचे महत्त्व पटवून दिले आहे. उदा. कोणाला संसर्ग झाला आहे किंवा अशा व्यक्तीच्या संपर्कात कोण आले आहे? विशेषत: आजारपणात मित्रांच्या गटात संवाद स्पष्ट ठेवा.
आरोग्य टिपांसह एनवायटीने वर्ष चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी जीवनाचे तत्त्वज्ञान स्पष्ट करण्यासाठी काही निवडक सल्लेदेखील दिले आहेत. ते असे ः
मेलिसा किर्ष }बस्तान बसले आहे तिथेच राहा. }जीवन व सामानाच्या कपाटात काही भरताना काही काढूनही टाकले पाहिजे. }आनंदी वाटत असताना त्याबद्दल बोलणे टाळा, फक्त ती अनुभवा. }आपल्या सर्व भावनांशी स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करावाच, असे नाही. }प्रत्येक जण काही ना काही परिस्थितीतून जात आहे, त्याचा विचार करून निर्णय घ्या. }काम करणे सक्तीचे नसते तर तरीही काम केले असते का? }कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारा : यामुळे मला हलके वाटेल का?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.