आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रयत्न:नवीन बदल आणून काम अन् जीवनात संतुलन साधा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जुने मार्ग सोडून नवीन मार्ग स्वीकारा, जेणेकरून नवीन वर्षात तुम्हाला जीवनात चांगले संतुलन साधता येईल...

स्वत:विषयी विचार करा आपल्यावर कशाचा ताण पडतोय याचा विचार करा. तुमच्या कामावर आणि कामगिरीवर त्याचा कितपत परिणाम होतो, त्याचा तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम होतो का याचा विचार करा, तुम्ही कशाला प्राधान्य देता आणि कशाचा त्याग करता याचाही विचार करा.

भावनांना समजून घ्या... आपल्या वर्तमान स्थितीमुळे तुम्ही किती आनंदी आहात ते समूजन घ्या. समाधानी आहात की नाही? तुम्हाला ऊर्जावान वाटते का ? खुश आहात का ? तुम्ही जास्त वेळ तणावात राहता का ? काळजी करता का? रागात असता का ? याचाही विचार करा.

पर्याय शोधत चला तुमच्या जीवनातील पैलूंचा विचार करा, ज्याला तुम्ही प्राधान्य देता. तुमच्या नोकरीत काही गोष्टी बदलायच्या आहेत का? तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत किती वेळ घालवायचा आणि तुमचा छंद जोपासायला किती वेळ द्यायचा याचा विचार करा. प्राधान्यक्रम रिसेट करा स्वतःला विचारा, तुम्ही आनंदाने काय सोडून देण्यास तयार आहात आणि किती काळ? तुमच्या आयुष्यात आधीच कोणते पश्चात्ताप आहेत आणि पुढे काय शक्यता आहेत?

बातम्या आणखी आहेत...