आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावीन्याने चकित करेल वर्ष:कर्करोगावरील लस फक्त एका पावलावर, स्वच्छ ऊर्जाही टप्प्यात

एंड्रयू रॉस, रवि मट्‌टू, बर्नहार्ड वॉर्नर, सारा केसलर, स्टीफन गेंडेल, मायकेल डे ला मेरसेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२०२२ मंदीच्या छायेत गेले. तिहेरी महामारी अर्थात कोविड-१९, फ्लू आणि रेस्पिरेटरी सिनसिटिकल विषाणूसह हवामान संकट आणि रशिया-युक्रेन युद्ध यात काही फरक दिसत नाही. परंतु, आव्हानांच्या दरम्यान या २०२३ वर्षात आपण आशा बाळगू शकतो अशी अनेक कारणे आहेत.

न्यूक्लियर फ्यूजनच्या यशाने वाढला शास्त्रज्ञांचा उत्साह डिसेंबरमध्ये शास्त्रज्ञांना न्यूक्लियर फ्यूजनमध्ये मोठे यश मिळाले. फ्यूजन ऊर्जेबाबत शास्त्रज्ञांचे मत आहे की, तिचा वापर मोठ्या प्रमाणावर करता आला तर ती अमर्याद प्रमाणात प्रदूषणमुक्त उर्जेचा स्रोत ठरेल. कॅलिफोर्नियाच्या लॉरेन्स लिव्हरमोर नॅशनल लॅबमधील शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला. वास्तविक जीवनात फ्यूजन वापरण्यास अनेक दशके लागतील, तरीही त्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे.

ग्रीन टेकबाबत बाजार आणि गुंतवणूकदारही सकारात्मक बिल गेट्स यांनी अलीकडेच याकडे लक्ष वेधले की, २०१५ मध्ये पॅरिस करारानंतर हवामान संशोधन वेगाने वाढत आहे. गेल्या दोन वर्षांत खासगी गुंतवणूक ७० अब्ज डाॅलर होती. आता नवीन तंत्रज्ञान हवामानाच्या समस्येकडे आपले लक्ष वळवत आहेत. ब्लॅकराॅकचे सीईओ लॅरी फिंक यांचा अंदाज आहे की, पृृथ्वीवरील सर्वात मोठ्या समस्या सोडवणाऱ्या स्टार्टअप्सना उद्यम भांडवलदारांकडून सर्वाधिक गुंतवणूक मिळेल.

मॉडर्नाची स्किन कॅन्सरची लस मध्य चाचणीत यशस्वी कर्करोगाचा उच्च धोका असलेल्या लोकांना त्याच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षणासाठी किंवा लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली त्यांचेही लसीकरण केले जाऊ शकते. अलीकडे या दिशेने प्रगती झाली. अध्ययनाचे खूप सकारात्मक परिणाम दिसले. मॉडर्नाने डिसेंबरमध्ये अहवाल दिला की, त्वचेच्या कर्करोगावरील लस मध्य टप्प्यातील चाचण्यांत यशस्वी झाली. माॅडर्नाशिवाय इतर अनेक कंपन्या कर्करोगाच्या विविध लसींवर वेगाने काम करत आहेत.

बॉट्स माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेणार नाहीत तंत्रज्ञानामुळे मानवी नोकऱ्या संपतील का? नोव्हेंबरमध्ये ओपन एआय कंपनीने चॅटजीपीटी सादर केल्यानंतर ही भीती पुन्हा वाढली. परंतु, एआय तज्ज्ञांना विश्वास आहे की, अशा तंत्रज्ञानाच्या काही मर्यादा आहेत, त्यामुळे मानवांना पूर्णपणे बदलणे अशक्य होते. बॉट्स पुनरावृत्तीची कामे करू शकतात, परंतु सर्जनशील कार्यांमध्ये मानवांना हरवू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...