आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 च्या मोठ्या घटना:हायड्रोजन इंधनाने व्यावसायिक उड्डाण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या जगातील पहिल्या जेट विमानाचे पहिले उड्डाण यूएन क्लायमॅट चेंज कॉन्फरन्समध्ये दाखवण्यात आले, पण यावर्षी नोव्हेंबरपासून ते यूएईमधील खासगी ग्राहकांसाठी व्यावसायिक उड्डाणे सुरू करणार आहेत. हे स्वित्झर्लंडमधील एका स्टार्टअपने बनवले आहे.

१०० वर्षांचे होईल डिस्ने २०२३ मध्ये वॉर्नर ब्रदर्स आणि डिस्ने या जगप्रसिद्ध स्टुडिओच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. वॉर्नर स्टुडिओची स्थापना चार वॉर्नर बंधूंनी केली होती, तर डिस्नेची स्थापना वॉल्ट डिस्नेने केली होती.

शेवटच्या वेळी घड्याळ १ तास पुढे मार्चच्या दुसऱ्या रविवारी वसंत ऋतूच्या सुरुवातीला अमेरिकेत घड्याळे एक तास पुढे केली जातात. ही परंपरा २०२३ मध्ये शेवटच्या वेळी पार पाडली जाणार आहे. त्यामुळे संभ्रम निर्माण व्हायचा. हे डेलाइट सेव्हिंग टाइम (डीएसटी) प्रणाली अंतर्गत घडते.

किंग चार्ल्स यांचा राज्याभिषेक राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनचे नवे राजा चार्ल्स तिसरे यांचा या वर्षी ६ मे रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक होणार आहे.

इजिप्तच्या राजधानी ः प्रथम टप्पा पूर्ण इजिप्तची नवीन प्रशासकीय राजधानी असलेल्या कैरोच्या पुनर्वसनाचा पहिला टप्पा २०२३ मध्ये पूर्ण होणार आहे. त्यासाठी ३० अब्ज डॉलर खर्च आला.

बातम्या आणखी आहेत...