आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या वर्षात नव्या विचाराचा स्वागत करा. स्वत:मध्ये बदल घडवण्यासाठी, आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी नवीन वर्ष एक उत्तम काळ असतो. सुरुवातीला आपल्यासाठी छोटे आणि सोपे ध्येय ठरवा, त्यामुळेच तुम्हाला दीर्घकाळ यश आणि सुख मिळेल. आपल्या आनंदासाठी प्रयत्न करा.
नवीन वर्षात आनंदी राहण्यासाठी सल्ला
रोज स्वत:ला थोडा वेळ द्या
सकाळी लवकर उठुन दिवसाची सुरुवात करा. काही वेळ फक्त तुमच्यासाठी काढा. शांततेने सुरुवात करा. यावेळी दिवभरात करणाऱ्या कामाची यादी तया करा. प्रार्थना किंवा ध्यान धारणासाठी वेळ काढा. दिवसाची सुरुवात करण्याआधी शांतपणे स्वत:चा विचार करा. रोज असे केल्याने समाधानी वाटेल.
तुमच्या नियंत्रणात काय-काय आहे ?
हवामानावर किंवा लोकांवर तुम्ही नियंत्रण ठेवु शकत नाही. पण तुम्ही स्वतःवर नक्कीच नियंत्रण ठेवु शकता. त्यामुळे स्वत:चा विचार करा आणि स्वतःवर नियंत्रण ठेवा. काय करायचं, काय खायचं, हे सर्व तुमच्या हातात आहे. लोकांना बदलण्याचा कधीही प्रयत्न करू नका. स्वतःला बदला. तेच सोपे आहे.
दुसऱ्यांना नेहमी प्रोत्साहन द्या
जग बदलण्याची शक्ती आपल्या आहे, असा विचार करा. चांगल्या कामाचे नेहमी कौतुक करा, सहकाऱ्यांना विचारा, तुला मदतीची गरज आहे का ? जुन्या मित्रांना फोन करून त्यांची विचारपुस करा. शेजाऱ्यांना भेटा. तुम्ही जग सुंदर बनवू शकता.
तुमच्या वागण्यात कृतज्ञता आणा
काही लोक अगदी मूलभूत गरजांशिवाय कसे जीवन जगतात जेव्हा तुम्ही हे पाहता तेव्हा तुमचा दृष्टीकोन बदलतो. अशा प्रकारे तुम्ही लोकांना मदत करण्यास सुरुवात करता. तुमच्याकडे जे आहे आणि जे नाही, त्यात तुम्ही बऱ्याच अंशी समाधानी आहात. आयुष्य चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी तुमच्या मनात कृतज्ञतेची भावना असली पाहिजे.
स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा
आयुष्यात सतत जबाबदाऱ्या पेलणे कंटाळवाणे वाटु शकते. कामावर जाणे, बिले भरणे, फक्त या गोष्टींमध्ये व्यग्र राहणे तुम्हाला जीवनाबद्दल उदासीन बनवू शकते. बालपणात, आपण निश्चितपणे एक किंवा दुसरे स्वप्न पाहतो. त्या स्वप्नांचा विचार करा आणि त्यांची यादी तयार करा. तुमच्या स्वप्नांना सत्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न करा.
नेहमी हासण्याचा प्रयत्न करा
हसणे सगळ्यात चांगलं औषध आहे, असे म्हणतात. नेहमी हसत राहा, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. विनोदी चित्रपट, विनोदी मालिका पहा. विनोदी शैली असलेल्या मित्रांसोबत वेळ घालवा. अशा मित्रांना कधी गमवु नका. मुलांसोबत वेळ घालवा. त्यांच्या बोलण्यावर हसा, त्यांच्यासोबत खेळा. हसणे तुम्हाला सकारात्मक बनवते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.