आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आपण जर नव्या आणि उत्कृष्ट सवयी सुरू सुरू करणार असू तर त्यासाठी काय गरजेचे असते ते जाणून घ्या...
1 आधी आपले ध्येय समजून घेण्याचा प्रयत्न करा रुटीनला सवय बनण्यात खूपच वेळ लागतो, त्यामुळे ज्या सवयी लावायच्या आहेत, त्यांची निवड काळजीपूर्वक करा, जेणेकरून नंतर काही समस्या उद््भवणार नाही. शिवाय या सवयीमुळे काय मिळेल याचाही विचार करावा. तुम्हाला तुमचं ध्येय कळेल तेव्हा तुम्ही मागे सरकणार नाही, नेहमी प्रेरणा मिळत राहील.
2 मार्गातील अडथळे शोधा आणि त्यावर काम करा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोण रोखत आहे का ? तुमच्या मार्गात काय अडथळा येत आहे का याचा विचार करा. तुमचे व्यग्र वेळापत्रक तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचू देत नाही का ? कॅलेंडरमध्ये स्वतःसाठी ३०-६० मिनिटे जतन करून ठेवा. तुम्हाला प्रेरणा मिळत नसेल तर तुमच्या ध्येयाबद्दल मित्राशी बोला.
3 छोट्या बदलासह मोठ्याची सुरुवात करा नवीन दिनचर्या स्वीकारण्यासाठी वास्तविक पावले उचला. नवीन सवयी अंगीकारण्यासाठी तुमचा वेळ पुन्हा शेड्यूल करा. लहान पावले उचलूनच तुम्ही मोठ्या बदलाकडे जाऊ शकता. तुम्हाला आवडलेल्या कामाची सवय लावा. उदाहरणार्थ, तुम्हाला संगीत ऐकायला आवडत असेल तर तुम्ही व्यायाम करत असताना ऐका.
4 स्वत:शीच कठोर वागू नका, धैर्य ठेवा नवीन वर्षात नवीन आणि चांगल्या सवयी अंगीकारण्याच्या प्रवासात स्वतःशी जास्त कठोर होऊ नका. तुम्हाला कायमचा कोणताही मोठा बदल करायचा असेल तर त्याला थोडा वेळ लागतो, याची जाणीव ठेवा. या प्रवासात चालताना अनेक चढउतार येतील. त्यांना घाबरू नका, धैर्याने पुढे जा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.