आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2023 मध्ये कसे असेल तंत्रज्ञान...:बोलणारा असिस्टंट, सोशल मीडियाचे पर्याय मिळतील

ब्रायन एक्स. चेनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी तंत्रज्ञानविश्वात नवीन काय आले आहे आणि काय बाहेर पडणार आहे, हे पाहणे मनोरंजक ठरते. २०२२ मध्ये हार्डवेअरमध्ये फारसा रस दिसला नाही - अगदी आयफोनमध्येही नाही. मेटाने १५०० डाॅलरचा व्हर्च्युअल-रिअॅलिटी हेडसेट आणला, त्याची बॅटरी फक्त दोन तासांची असली तरीही जग बदलेल, असे मार्क झुकेरबर्ग यांना वाटत होते. लोक त्याला गेम खेळण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मानले नाही. पण २०२३ मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक मनोरंजक शोध समोर येतील. एआयवर चालणारे टेक असिस्टंट आपले काम सोपे करतील. त्यांना अनेक भाषा समजतील. इलेक्ट्रिक कार, मेटाव्हर्ससारखे ट्रेंड पुढे जातील. सोशल मीडियाचा पुनर्जन्म शक्य आहे. लोक संवादाचे नवीन पर्याय वापरतील.

बोलणारा असिस्टंट काही वेळा चॅटबॉट-चॅटजीपीटीच्या चुकांमुळे लोक हैराण होतात. कंपन्या या चॅटबॉट्स आणि टूल्सच्या वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करतील, असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे लेखन आणि वाचन सुधारेल. पुढील वर्षी संशोधन सहायक म्हणून काम करणारा चॅटबॉट येऊ शकतो. तो १०० पानांच्या दस्तऐवजाचा सारांश काढण्यास सक्षम असेल. अनेक साधने त्यांच्या अॅपमध्ये आपोआप भाषा निर्माण करण्यास सक्षम असतील. मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि गुगल शीट्ससारख्या अॅप्समध्ये लवकरच एआय टूल्सचा समावेश होईल. याचा अर्थ असा नाही की, आप२०२३ मध्ये स्टँड-अलोन एआय अॅप्सची गर्दी दिसेल. आपण वापरत असलेली साधने त्यांच्या अॅप्समध्ये स्वयंचलित भाषा निर्मिती सुरू करतील.

चांगल्या इलेक्ट्रिक कार टेस्लाने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारपेठेत वर्चस्व गाजवले आहे, परंतु २०२३ हे उद्योगासाठी एक टर्निंग पॉइंट ठरू शकते. मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर टेस्लाचे शेअर्स घसरत आहेत, तर फोर्ड, किया, जनरल मोटर्स, ऑडी आणि रिव्हियन यांनी उत्पादन वाढवले ​​आहे. असे दिसते की, २०२३ मध्ये इलेक्ट्रिक कार उद्योगात बरीच हालचाल होईल.

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीचे वेगळे रूप पाहायला मिळेल... दहा वर्षांपासून टेक कंपन्या गेम खेळण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी हेडसेट देत आहेत. आता ते आकर्षक आश्वासने देत आहेत की, हे हेडसेट आपले जीवन स्मार्ट फोनप्रमाणेच बदलतील. मेटा म्हणते की, त्याचा हेडसेट क्वेस्ट प्रो मल्टिटास्किंग टूल म्हणून काम करेल. अॅपल २०२३ मध्ये आपला पहिला हेडसेट सादर करू शकते. दुसरीकडे तंत्रज्ञान विश्लेषक कॅरोलिना मिलानेसी म्हणतात, नवीन वर्षात मेटाव्हर्स, व्हर्च्युअल रिअॅलिटीवर खूप चर्चा होईल, पण हे हेडसेट फारसे लोकप्रिय होणार नाहीत.

ट्विटरचा पर्याय शोधतील लोक २०२२ मध्ये ट्विटर सोशल मीडिया साइट अनागोंदीने घेरली होती. बाइटडान्स चिनी कंपनीचे टिकटाॅक अॅप अमेरिकेत चौकशीला सामोरे जात आहे. त्यामुळे ट्विटर आणि टिकटाॅकची परिस्थिती काहीही असली तरी सोशल मीडियामध्ये मोठा बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक पत्रकार, तंत्रज्ञ, इन्फ्लुएन्सर ट्विटरसारख्या मेस्टोडॉन सोशल नेटवर्ककडे गेले आहेत. बिरियलसारख्या नवीन अॅप्सकडे मोठ्या संख्येने तरुणाई वळली आहे. यामध्ये मित्रांचे गट सेल्फी शेअर करून संपर्कातही राहू शकतात. २०२३ मध्ये नवीन खेळाडू सोशल मीडियावर त्यांचा प्रभाव वाढवू शकतात. नवीन वर्षात कोणते सोशल मीडिया प्लेयर्स केंद्रस्थानी जातील हे स्पष्ट नाही, परंतु ट्विटरला कंटाळलेले लोक नक्कीच चांगला पर्याय शोधत आहेत.

बातम्या आणखी आहेत...