आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्पादकता पूर्वीपेक्षा चांगली, घरे झाली स्वस्त, प्रदूषण कमी होतेय जोस मारिया बरेरो,निक ब्लूम, स्टीवन डेविस
अमेरिकेसह अनेक देशांमध्ये महामारीनंतर घरून काम करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. हा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या कार्यक्षेत्रातील सर्वात मोठा बदल आहे. साथीच्या आजारापूर्वी, सर्व कामकाजाच्या दिवसांपैकी फक्त पाच टक्के काम घरून होते. डिसेंबर २०२२मध्ये ३० टक्के होते. या बदलाचा सर्वाधिक फायदा कर्मचाऱ्यांना झाला आहे. टाइम मॅगझिनच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना असा विश्वास आहे की, आठवड्यातून दोन ते तीन दिवस घरून काम केल्याने त्यांच्या वेतनातील ८ टक्के बचत होते. फायद्यांमुळे ही नवीन प्रणाली यावर्षी व पुढील वर्षांतही सुरू राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे. एका तंत्रज्ञान कंपनीने निवडक कर्मचाऱ्यांमध्ये आठवड्यातून दोन दिवस घरून काम करण्याचा प्रयोग केला. अशा कर्मचाऱ्यांमध्ये सोडण्याचे प्रमाण ३५ टक्के कमी होते. घरून कामाची सुविधा असलेल्या कंपनीत राहण्याच्या बाजूने कर्मचारी आहेत.
अधिक काम नवीन प्रणालीचा फायदा कंपन्यांनाही होतो. जेव्हा कर्मचारी घरून काम करतात तेव्हा उत्पादकता सुमारे तीन ते पाच टक्क्यांनी वाढते. कार्यालयात येण्यासाठी निघालेला वेळ कामासाठी वापरला जातो.
अधिक घरे बांधली जाताहेतअर्जुन रामाणी यांच्या संशोधनातून असे दिसून आले की, नवीन प्रणालीमुळे घराच्या किमती आणि भाडे कमी झाले आहेत. जॉर्डन रॅपापोर्टच्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे, मोठ्या शहरांच्या उपनगरात घरे बांधण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या किमती खाली येत आहेत.
खूप कमी हालचालअमेरिकेत घरून काम करण्याच्या वाढत्या ट्रेंडमुळे दर आठवड्याला लोकांची ये-जा सहा अब्ज मैलांनी कमी झाली आहे. वाहनांचे प्रदूषण कमी झाले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे व्यावसायिक प्रवास कमी झाला आहे. जर अर्थव्यवस्था घसरली आणि रोजगाराची मागणी कमकुवत झाली, तर घरातून कामात थोडीशी घट होऊ शकते. असे असले तरी घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लवकरच वाढणार आहे. महामारीनंतर, अमेरिका आणि इतर देशांमध्ये हा ट्रेंड सहा पट वाढला आहे.
नवीन पेटंट हार्डवेअर व सॉफ्टवेअर कंपन्या घरून काम करणे अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहेत. युलिया जेस्टकोवा व मिहाई कोडरेनू यांच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, अमेरिकेमध्ये रिमोट वर्क सक्षम करणाऱ्या तंत्रज्ञानासाठी पेटंट अर्जांची संख्या २०२० पासून दुप्पट झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.