आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:2023 मधील या निवडणुका अनेक देशांसाठी महत्त्वाच्या

सान्या मन्सूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी होत असलेल्या प्रमुख निवडणुका

}पाकिस्तान एप्रिलमध्ये अविश्वास प्रस्तावानंतर माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार पडले. त्यांनी सरकारविरोधात अनेक मोर्चे काढले. पाकिस्तान मुस्लिम लीगचे शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकार आर्थिक संकट, दहशतवादी हल्ले आणि पूर यांना सामोरे जाण्यात अपयशी ठरले आहे. घटनेनुसार पाकिस्तानमध्ये १२ ऑक्टोबरपर्यंत निवडणुका व्हायला हव्यात.

}नायजेरिया आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या नायजेरियात २५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. फुटीरतावादी आणि अतिरेकी गटांकडून होणाऱ्या हिंसेमुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न असेल. अखिल प्रगतिशील काँग्रेस पार्टी (एपीसी)चे सरकारप्रमुख राष्ट्रपती मुहम्मद बुहारी निवडणूक लढणार नाही.एपीसीने बुहारीच्या जागी असिवाजू अहमद टिनुबू यांना उमेदवारी दिली आहे.

}बांगलादेश सध्याचे सरकार २००९ पासून सत्तेत आहे. सरकार विरोधी पक्षनेते व कार्यकर्त्यांवर कडक दडपशाही करत आहे. पंतप्रधान शेख हसीना वाझेद यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या महिन्यात देशभरात निदर्शने झाली. विरोधी नेते, कार्यकर्त्यांना अटक केली. डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुका निष्पक्ष होतील, अशी शंका जाणकारांनी व्यक्त केली आहे.

}तुर्की राष्ट्रपती रेसेप तय्यप एर्दोगन यांच्या सरकारला १८ जून रोजी निवडणुकीच्या कठीण आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. २०१८ मध्ये संसदीय सरकारच्या जागी अध्यक्षीय शासन प्रणाली झाल्यानंतर तुर्की हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहे. आर्थिक संकट व महागाईमुळे एर्दोगन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...