आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New year 2023
  • These Five Methods Will Make Relationships Stronger, Leading To Better Relationships With Family And Friends

कुटुंबासाठी...:या पाच पद्धतींनी नातेसंबंध होतील घट्ट, कुटुंब आणि मित्रांशी चांगल्या संबंधांचा मार्ग

कॅथरीन पिअर्सनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नातेसंबंध हे निरोगी, आनंदी आणि समाधानी जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. असे काही मार्ग आहेत, ज्याद्वारे तुम्ही मित्र आणि कुटुंबासोबतच्या तुमच्या नातेसंबंधात घनिष्ठतेचे रंग भरू शकता. मानसशास्त्रज्ञ मारिसा फ्रँको म्हणतात की, संशोधनात दिसून आले आहे की, आपण लोकांना किती आवडतो, याचा अंदाज लावू शकत नाही. इतर लोक त्यांच्यासारखेच असल्याचे लोकांना वाटते, तेव्हा ते त्यांच्यासमोर अधिक खुलतात. त्यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करतात. त्यामुळे मैत्री करताना हे लक्षात ठेवा. १) चांगल्या कामांना कमी लेखू नका ः इतरांना मदत करताना लोक त्यांच्या कामाला कमी लेखतात. त्यांना वाटते, ते फारसे महत्त्वाचे काम करत नाहीत. पण, ज्याला मदत मिळते त्याला ते जाणवते. त्यामुळे तुमचे गुण लक्षात घेऊन तुम्ही लोकांना कसे उपयोगी पडू शकता याचा विचार करा. २) कुशल विचारण्याचे फायदे ः फोनवर मित्राला नमस्कार करणे, मेसेज किंवा मेल पाठवणे याचा चांगला परिणाम होतो. १३ छोट्या प्रयोगांतून हा निष्कर्ष निघाला. यामुळे इतरांचे मनोबल वाढते. लोकांना असे उपक्रम अपेक्षेपेक्षा जास्त आवडतात.

३) जोडीदाराची काळजी घ्या ः मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, जोडीदाराकडे वारंवार वळल्याने त्यांच्यात परस्पर समज वाढते. जे लोक दिवसभरात ८०% पेक्षा जास्त वेळ एकमेकांकडे लक्ष देतात त्यांचे वैवाहिक आयुष्य दीर्घ असते.

४) द्वेष ओळखा ः कौटुंबिक संबंध सल्लागार टेरेन्स रिअल म्हणतात, वैवाहिक नातेसंबंधात प्रेमाचे तीन टप्पे आहेत ः मधुर संबंध, घृणा आणि सुधारण्याचा प्रयत्न. पण लोक भ्रम, द्वेष अशा भावनांबद्दल बोलत नाहीत. तसे असल्यास आपल्या जोडीदाराशी याबद्दल अवश्य बोला. ५) इतरांच्या यशाचा आनंद ः कुणाच्या यशात व आनंदात सहभागी होण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे जीवनातील समाधान वाढते. स्वभावात लवचिकता येते. लोकांचे छोटे यश आणि त्यांच्या चांगल्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

बातम्या आणखी आहेत...