आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Know The Incident Because Of Which Abhinav Bindra Came 4th In The Shooting Event

हुल्लडबाजांनीच केला बिंद्राचा घात; शूटआऊटसाठी सज्ज होताच पिटल्या टाळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ- प्रेक्षकांत बसलेल्या प्रशिक्षित हुल्लडबाजांमार्फत प्रतिस्पर्ध्यांची एकाग्रता भंग करून त्याचे पदक हुकवण्याची नवी शक्कल रिओ ऑलिम्पिकमध्ये विजेत्यांच्या मानसोपचार तज्ज्ञांनी शोधून काढली आहे. अभिनव बिंद्राचे पदक हुकले त्याचे प्रमुख कारणही तेच असल्याचे १० मीटर्स एअर पिस्तूल गटाचा सुवर्णपदक विजेता कॅप्रियानी याने भारतीय पत्रकारांशी बोलताना जाहीरपणे सांगितले.

बिंद्राला ब्राँझ पदकासाठीच्या ‘शूट आऊट’च्या वेळी आरडाओरड करून त्याची एकाग्रता भंग करणारे भारतीय नव्हते, तर ते होते युक्रेनचे.

यजमान ब्राझीलच्या स्थानिक लोकांना हाताशी धरून महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पेरलेल्या अशा अागंतुक फॅन्सची फळी या ऑलिम्पिकमध्ये तयार करण्यात आली आहे. अल्प मोबदल्यात अशा फॅन्सना महत्त्वाच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंची एकाग्रता कशी भंग करायची याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

भारताच्या अभिनव बिंद्रा याच्या मानसिकतेचा तमाम विश्वाने अभ्यास केला आहे. त्याला सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ‘चिअर अप’ करण्याची आवश्यकता नसते. त्याला त्या वेळी शांतता हवी असते.

पुढील स्लाइडवर वाचा खोडसाळांना खास प्रशिक्षण...
बातम्या आणखी आहेत...