Home | International | Other Country | A traffic policeman fined a driver for circling with excess beauty in Uruguay

ट्रॅफिक पोलिसाचे अजब कृत्य, सौंदर्यामुळे कापले महिलेचे चालान, म्हणाले-तुमच्यामुळे इतर लोकांचे लक्ष विचलित होत आहे

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 04:56 PM IST

चौकशीत जर कर्मचारी दोषी आढळला तर नियमांतर्गत त्याला निलंबित केले जाऊ शकते

  • A traffic policeman fined a driver for circling with excess beauty in Uruguay

    मोंटेव्हिडिओ(उरूग्वे)- येथील पेसेंदू शहरात एक अजब प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका ट्रॅफिक पोलिसाने मोटारसायकल स्वार एका महिलेचे चालान कापले. पोलिसाने चालानवर लिहले की, आपण खूप सुंदर असल्यामुळे तूम्हाला पाहून इतर लोकांचे लक्ष विचलित होऊन दुर्घटनाही होऊ शकते, त्यामुळे तुम्हाला दंड भरावा लागेल. इतकेच नाही तर, पोलिसाने पावतीवर स्पॅनिश भाषेत महिलेला प्रपोजही केले. त्यात स्पॅनिशमध्ये ती-अमो म्हणजे मी तूझ्यावर प्रेम करतो असे लिहिले होते.

    महिलेने हे चालान सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे काही वेळानंतर ते व्हायरल झाले. त्यामुळे ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हायरल झालेल्या पोस्टवर लोकांनीही गमतीशीर प्रतिक्रिया दिल्या. काही लोकं याला ट्रॅफिक कर्मचाऱ्याचा उद्धटपणा म्हणतात, तर काहींनी त्या कर्मचाऱ्याने महिलेवर आपल्या पदाचा रूबाब दाखवल्याचे म्हटले आहे.

    चुक आढळल्यास जाऊ शकते नोकरी
    ट्रॅफिक पोलिसाचे असे वागणे त्याच्या अंगलट येऊ शकते. माहितीनुसार, विभागीय चौकशीत जर कर्मचारी दोषी आढळला तर नियमांतर्गत त्याला निलंबित केले जाऊ शकते.

Trending