आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेटकीण म्हणून वृद्ध महिलेला करत होते मारहाण, पोलिस पोहचले तेव्हा गावकऱ्यांनी त्यांनाच ठेवले ओलिस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपूर- सुंदरनगर ठाणे भागातील पुडीहासा गावात रविवारी ग्रामस्थांनी जादू-टोनाचा संशय घेऊन एका वृद्ध महिलेला बंदी बनवले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनाही ग्रामस्थांनी बंदी बनवले. त्यामुळे अतिरिक्त पोलिस दल बोलवून महिलेला वाचवण्यात आले. तसेच, या प्रकारामुळे गावात तणाव निर्माण झाला असून मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात करण्यात आले आहे.

 

महिलेला बंदी केल्याची माहिती मिळताच एएसआय मरांडी पोलिस जवानांसह घटनास्थळी पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांना बंदी बनवले. त्यामुळे डिएसपी आलोक रंजक यांनी क्यूआरटी टिमला पाचारण केले. त्यांनी गावातील लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यात मतभेद झाले. यादरम्यान लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर जेव्हा पोलिसांनी महिलेची सुटका करून आपल्या गाडीत बसवले तेव्हा ग्रामस्थांनी एक तास पोलिसांची गाडी घेरली. त्यामुळे पोलिसांनी ग्रामस्थांची खूप समजूत घातली तेव्हा ते तयार झाले आणि पोलिसांचा मार्ग मोकळा केला.
  

मुलीची प्रकृती बिघडल्यामुळे महिलेला डायन म्हणून घरातून बाहेर काढले
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 70 वर्षाची आझो हेम्ब्रमकडे शेजारी राहणारी बबीता (15) गेली होती. तिथून परतल्यानंतर अचानक बबीताची प्रकृती खराब झाली. त्यामुळे लोकांना वाटले की, आझोने तिच्यावर जादू-टोना केला आहे. ही गोष्ट सर्व गावात माहित झाल्यानंतर आझोला घरातून बाहेर काढले आणि शिवीगाळ करण्यात आली. यादरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर डिएसपींनी सांगितले की, अंधश्रद्धेमुळे ग्रामस्थांनी हे चुकीचे पाऊल उचलले आहे, पण आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

 

गढवामध्ये बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी 5 तास रोखले
दुसरीकडे दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या समीदा खातूनचा तपास करण्यासाठी तसरार गावामध्ये आलेल्या पोलिसांना ग्रामस्थांनी पाच तास बंधक बनवले. सुरूवातीला डंडई पोलिस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना बंदी बनवले आणि जेव्हा डिएसपी आपल्या चार जवानांसह गेले तेव्हा त्यांनाही बंदी बनवण्यात आले. त्यानंतर महिलांनी पोलिसांच्या गाडीसमोर ऊभा राहून रस्ता अडवला. आरोपींना लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी सायंकाळी 7 वाजता पोलिसांना जाण्याचा मार्ग मोकळा केला. तसरार गावचे रहिवासी असलेल्या सासरच्या मंडळींनी समीदाची हत्या करून साक्ष लपवण्यासाठी मृतदेह फेकून दिला होता. असा आरोप करण्यात आला होता.