Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा मंगळवार

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 11, 2019, 12:00 AM IST

ग्रहस्थिती आणि योग-संयोगामुळे पैशांच्या बाबतीत सावध राहावे लागेल

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  आज मंगळवार 11 जून 2019 रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. या नक्षत्राच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. उर्वरीत सर्वच राशीच्या लोकांना उद्योग, नोकरी आणि पैशांच्या बाबतीत सावध राहावे लागेल. काहींना आजच्या दिवशी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबाची साथ मिळेल. तर काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी, कुटुंब, प्रेम आणि व्यवसायासाठी कसा राहील आपला दिवस...

  सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढी स्लाइड्सवर क्लिक करा...

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  मेष: शुभरंग- गुलाबी, अंक-५
  घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा कर्तृत्वाचाही प्रभाव पडेल‌‌. संभाषण चातुर्याने बरेच प्रश्न सोडवाल. उद्योगधंद्यात वेळीच योग्य निर्णय फायदेशीर ठरतील. मुले आज तुमच्या मनासारखी वागतील. गृहिणींना आवडता छंद जोपासता येईल.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  सिंहः शुभरंग- पिवळा, अंक-९ 
  व्यापारी वर्गाची आवक समाधानकारक राहील. नोकरीत वरिष्ठांचे कृपाछत्र असेल. घेतलेल निर्णयही अचूक ठरतील. कौटुंबिक सोहळ्यात सहभागी व्हाल. नवविवाहितांची सांसारिक स्वप्ने साकार होतील.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  मिथुनः शुभरंग- चंदेरी, अंक-५.
  धार्मिक कार्यातील सहभागाने मन प्रसन्न राहील. उद्योग धंद्यात जीवघेणी स्पर्धा राहील. तुमच्या संयमाची परीक्षा असेल, गुरुतुल्य व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन कामी येईल. उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  वृषभः शुभरंग- सोनेरी, अंक-९.
  व्यवसायात आव्हानात्मक स्थिती असेल. हाताखालच्या लोकांवर करडी नजर गरजेची. आज अधिकार गाजवायची संधी मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमचा प्रभाव वाढणार आहे. नवीन व्यावसायिकांनी संयम बाळगावा.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  कर्कः शुभरंग- मोरपंखी, अंक-१
  आपल्या कार्यक्षेत्रात आज सावधपणे पावले उचला. आत्मविश्वासास थोडा लगाम आवश्यक. काही आकस्मिक खर्च दार ठोठावणार आहेत. कुणालाही शब्द देण्याच्या भानगडीत पडूच नका. दानधर्म करण्याआधी शिल्लक तपासा.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  कन्याः शुभरंग- भगवा, अंक-७
  फार काबाडकष्ट न करता थोडं स्मार्ट वर्क करण्याचा तुम्ही विचार कराल. एखादा जुना अाजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, सतर्क राहा. काहीजणांना क्षुल्लक कारणावरून जोडीदाराचा रुसवा सहन करावा लागेल.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  वृश्चिकः शुभरंग- केशरी, अंक-४
  आर्थिक आवक मनाजोगती असल्याने आनंदी उत्साही असाल. राशीच्या चतुर्थात चंद्र असल्याने कौटुंबिक जीवनात सामंजस्य असेल. खिशात पैसा खेळता राहील. कुटुंबीयांचे हट्ट आनंदाने पुरवू शकाल. मुले आज्ञा पाळतील.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  कुंभः शुभरंग- अबोली, अंक-६
  नोकरी, व्यवसायात कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही तितकाच असल्याने तुमचा कामातील उत्साह दांडगा असेल. अधिकाराचा वापर करण्याची संधी मिळेल. आर्थिक अडचणी काढता पाय घेतील. चैनीसाठी खर्च होणार आहे.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  मकरः शुभरंग- जांभळा, अंक-४
  आज आर्थिक अडचणींवर तुमची जमेची बाजू चांगली साथ देईल. स्थावराच्या संदर्भातील काही महत्त्वाचे व्यवहार मार्गी लागू शकतील. एखादा अाकस्मिक धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. आज ऐषआरामाकडे कल राहील.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  धनूः शुभरंग- पिवळा, अंक-३
  आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. उगीचच एखाद्या गोष्टीचा त्रागा कराल. लहरी स्वभावामुळे आज तुमचे काही हितचिंतक दुखावले जण्याची शक्यता आहे. क्षुल्लक कारणाने कदाचित मातोश्रींचीही नाराजी ओढावून घ्याल.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  तूळः शुभरंग- निळा, अंक-२
  आर्थिक उन्नत्तीचे विविध मार्ग सुचतील. सहकारी तुमच्या मताचा आदर करतील. आज व्यवसायात मोठया उलाढाली वेग घेतील. संध्याकाळी प्रियजनांच्या गाठीभेटीत वेळ आनंदात जाईल. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राहील.

 • Aajche rashi bhavishya, 11 june 2019 daily horoscope in marathi

  मीनः शुभरंग- स्ट्रॉबेरी, अंक-८
  दगदग वाढली असली तरीही आता माघार नको, स्वप्नपूर्ती जवळच आहे. अधिकारी वर्ग टूरवर असण्याची शक्यता आहे. उच्चशिक्षणार्थींना परदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. ज्येष्ठ मंडळी धार्मिक स्थळी भेटी देतील.

Trending