Home | National | Other State | Sanjay Raut On Ram Mandir Construction Says PM Narendra Modi, Amit Shah, Yogi Adityanath Are Supreme Court

'आता नरेंद्र मोदीच न्यायालय आणि न्यायाधिश, त्यामुळे राम मंदिर बणनारच'- संजय राऊत

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 10, 2019, 08:16 PM IST

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे सर्व खासदार 16 जूनला अयोध्येत जाणार आहेत

  • Sanjay Raut On Ram Mandir Construction Says PM Narendra Modi, Amit Shah, Yogi Adityanath Are Supreme Court

    लखनऊ(उत्तर प्रदेश)- शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय राउत म्हणाले-'आता मोदीच न्यायालय आणि न्यायाधिश. जनतेने त्यांना आपला प्रमुख म्हणून निवडले आहे. त्यामुळेच आता शुध वेळ आली आहे, यावेळेस राम मंदिर बणनारच.' शिवसेना प्रमुखे उद्धव ठाकरे आणि पक्षाचे सर्व खासदार 16 जूनला आयोध्येत जाणार आहेत, त्यानिमीत्ताने संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांची भेट घेतली.


    राऊत म्हणाले की, भाजप परत-परत मंदिराच्या नावाने मतदान मागू शकत नाही. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात आयोध्येत मंदिराचे काम सुरू होईल. शिवसेनेने अधिच स्पष्ट केले आहे की, आधि मंदिर नंतर सरकार. आधी सगळे राम मंदिराबद्दल बोलायचे, पण पुलवामा हल्ला झाला. तेव्हा पंतप्रधानांसमोर अनेक आव्हाने होती, आम्ही देशाच्या हितासाठी निवडणुकीनंतर मंदिर बांधण्याचे बोललो होतोत. मंदिराच्या नावावर मत मागितली नव्हती. मोदी आणि योगीजींची श्रद्धा राम मंदिरावर आहे.


    रामाच्या आशिर्वादाने मिळाले यश
    राउत पुढे म्हणाले की, 16 जूनला शिवसेना प्रमुख आणि नवनिर्वाचीत सर्व खासदार आयोध्येत येणार आहेत. आम्हाला भगवान रामाच्या आशिर्वादाने विजय मिळाला आहे. निवडणुकीपूर्वी येथे अनेक कार्यक्रम झाले. तेव्हा उद्धव ठाकरेंनी येथे परत येतो असे सांगितले होते.

Trending