Home | Maharashtra | Mumbai | Shiv Sena mla internal politics

संभाव्य मंत्रिपदावरून शिवसेनेत धुसफूस, जयदत्त क्षीरसागर, तानाजी सावंत यांच्या नावाला विराेध

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 13, 2019, 08:53 AM IST

आमदारांची नाराजी कशी दूर करावी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमाेर पेच

  • Shiv Sena mla internal politics

    मुंबई - शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले हाेते, त्यामुळे लाेकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज हाेते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समाेर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा पेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसमाेर आहे.


    फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या वाट्याला १० मंत्रिपदे आली हाेती. त्यात दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, डाॅ. दीपक सावंत अशा परिषदेवरील नेत्यांनाच कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली हाेती. आताही संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले बीडचे जयदत्त क्षीरसागर आणि उस्मानाबादचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद आमदार तानाजी सावंत यांचे नाव घेतले जात आहे.

Trending