Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | vastu tips for office

कार्यस्थळी दरवाजासमोर टेबल ठेवू नये, यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो

रिलिजन डेस्क, | Update - Jun 26, 2019, 12:15 AM IST

ऑफिसमध्ये वास्तूच्या 6 टिप्स लक्षात ठेवल्यास वाढू शकते सकारात्मक ऊर्जा

 • vastu tips for office

  वास्तुशास्त्रामध्ये घरासोबतच कामाच्या ठिकाणासाठीसुद्धा काही टिप्स सांगण्यात आल्या आहेत. या टिप्सचा अवलंब केल्यास ऑफिसमधील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता वाढू शकते. कामाच्या ठिकाणी वास्तुदोष असल्यास कामामध्ये मन लागत नाही, तणाव कायम राहतो. उज्जैनचे ज्योतिषाचार्य आणि वास्तू विशेषज्ञ पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, कार्यस्थळाशी संबंधित काही खास टिप्स...


  1. ऑफिसमध्ये कोणत्याही रूममधील ठीक दरवाजासमोर टेबल ठेवू नये. यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो.


  2. ऑफिसमध्ये डार्क रंग उदा. हिरवा, निळा, काळा वापरू नये. याउलट फिकट रंग उदा. पांढरा, क्रीम, पिवळा वापरावा. यामुळे ऑफिसमधील निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते.


  3. ऑफिसमध्ये पाण्याची व्यवस्था उत्तर-पूर्व (ईशान्य)दिशेला असावी. असे केल्याने बिझनेसमध्ये वृद्धी होऊ शकते.


  4. धनाच्या देवतेचा वास उत्तर दिशेला मानला जातो, यामुळे ऑफिसमध्ये कॅशियरची बसण्याची व्यवस्था उत्तर दिशेला करावी.


  5. कॉम्प्युटर, विजेशी संबंधित मशीन आग्नेय (दक्षिण-पूर्व) दिशेला ठेवावेत. विजेशी संबंधित कामासाठी ही जागा चांगली मानली जाते.


  6. ऑफिसमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची बसण्याची व्यवस्था अशाप्रकारे करा की, कोणाचीही पाठ ऑफिसच्या मेनगेटकडे येणार नाही.

Trending