Home | Maharashtra | Vidarva | Akola | Officers of Quality Control of India inspect the sanitary latrine

क्वाॅलिटी कंट्रोल ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी केली स्वच्छतागृहांची तपासणी

प्रतिनिधी | Update - Aug 17, 2018, 12:38 PM IST

स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत क्वाॅलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे अधिकारी गोविंद चव्हाण

  • Officers of Quality Control of India inspect the sanitary latrine
    अकोला - स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत क्वाॅलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे अधिकारी गोविंद चव्हाण यांनी १६ ऑगस्ट रोजी महापालिका क्षेत्रातील वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची तपासणी केली. या तपासणी नंतर महापालिकेला गुणांक दिले जातील.

    क्वाॅलिटी कंट्रोल ऑफ इंडियाचे अधिकारी गोविंद चव्हाण यांनी किराणा बाजार मार्केट परिसर, बस स्थानक परिसर, मोर्णा नदी परिसर येथील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली. तसेच जठारपेठ येथील स्वामी विवेकानंद शाळा, कौलखेड येथील जिल्हा परिषद शाळा, नाजूर नगर, कब्रस्थान परिसर, शिवसेना वसाहत, यशवंत नगर, सिद्धार्थ नगर, तथागत नगर, शिवनी परिसर या भागातील वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहांची तपासणी केली. यावेळी उपायुक्त तथा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे नोडल अधिकारी अनिल बिडवे, क्षेत्रिय अधिकारी डॉ.दीपाली भोसले, पूनम कळंबे, वासुदेव वाघाळकर, दिलीप जाधव, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे शाम गाढे, साहाय्यक आरोग्य अधिकारी अब्दुल मतीन, प्रशांत राजूरकर, संजय खोसे तसेच आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.

Trending