आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल 50 हजार मतांनी पिछाडीवर;आम आदमी पार्टीचे सर्वेक्षण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - नरेंद्र मोदींना वाराणसीमध्ये आव्हान देणारे आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल 50 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. हे पक्षाचेच आकलन आहे. सव्वातीन लाखांपैकी 80,000 घरांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर हा अंदाज बांधण्यात आल्याचे पार्टीने म्हटले आहे.

दुसरीकडे केजरीवाल यांना वाराणसीमध्ये प्रचार करणे अवघड होत चालले आहे. ते जेथे जातात तेथे त्यांना मोदी समर्थक घेरू लागले आहेत. केजरीवाल यांचे प्रचारप्रमुख गोपाल मोहन यांनी सांगितले की, प्रचार सुरू झाला होता तेव्हा मोदींच्या तुलनेत केजरीवाल दोन लाख मतांनी पिछाडीवर होते. आता 50 हजार मतांनी मागे आहेत. पुढील 10 दिवसांमध्ये हा फरकही भरून काढण्यात येईल, परंतु केजरीवाल यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. गुरुवारी रात्री बीएचयूजवळील पानटपरीवर त्यांना घेरण्यात आले होते. शुक्रवारीही ते प्रचाराला निघाल्यानंतर मोदी समर्थकांनी त्यांना घेरले. त्यावर द्वेषाचे राजकारण आम्ही प्रेमात बदलून दाखवू, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. विरोध करणार्‍या लोकांबरोबर बसून चर्चा करू.