आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal's Tweet For Cash Earns Rs 80L For AAP In 24 Hours

भरभरून देणगी : ‘आप’च्या झोळीत महाराष्ट्राचे सव्वाचार कोटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढत देण्यासाठी मतदारांना मत देण्याची विनंती करतानाच आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला नागरिकांनी ओ दिला आणि पाहता पाहता दोन दिवसांत एक कोटीच्या वर निधी पक्षाकडे जमा झाला आहे.

गेल्या चार महिन्यांत पक्षाकडे 28 कोटींचा निधी गोळा झाला त्यात महाराष्ट्राचा वाटा हा सव्वाचार कोटींचा आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभांच्या खर्चावर होणार्‍या खर्चाचा खरपूस समाचार केजरीवाल यांनी घेतला आहे. वाराणसी येथे मोदींच्या विरोधात ते स्वत: लढत देत आहेत, तर अमेठी येथून राहुल गांधींच्या विरोधात आपचे कुमार विश्वास रिंगणात आहेत. या दोन्ही जागा अत्यंत महत्त्वाच्या असून दोन्ही ठिकाणी ‘आप’ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केजरीवाल यांनी ट्विटरवरून केले होते. सोबतच या निवडणुकीसाठी आर्थिक मदत करण्याची विनंती त्यांनी केली होती.

36 तासांत देशभरातून 1 कोटी 2 लाख आले. पहिल्या 24 तासांत 80 लाखांवर तर नंतरच्या 12 तासांत 22 लाखांचा निधी जमा झाला. आज दिवसभरात 821 दात्यांनी 34 लाख 39 हजार 35 रुपये पक्षाला दान दिले आहेत.

114 देशांमधूनही निधी
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर 12 डिसेंबर 2013 पासून आम आदमी पार्टीला 114 देशांतून मदत मिळाली. या काळात 93 हजार 348 दात्यांनी 28 कोटी 4 लाख 65 हजार 209 रुपये पाठवले. दिल्लीतून 5 कोटी, महाराष्ट्र 4 कोटी 25 लाख, उत्तर प्रदेश 2 कोटी 16 लाख, कर्नाटक 1 कोटी 74 लाख, हरियाणा 1 कोटी 61 लाख रुपये मदत मिळाली.