आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Approaches Election Commission Against Ramdev Video Leaked

रामदेव बाबांच्या \'पैशांच्या व्हिडिओ\'वरुन वादंग; काँग्रेस करणार आयोगाकडे तक्रार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवारासोबत त्यांच्याच मंचावर पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन गुप्तगू केल्या प्रकरणी रामदेव बाबा अडचणीत येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने पैशाच्या देवाण-घेवाणीची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्याची आणि रामदेव यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. तर इतरही पक्षांनी रामदेव बाबांविरोधात मोर्चा उघडला आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने रामदेव बाबा आणि भाजप उमेदवाराच्या पैशांच्या कथित देवाण-घेवाणीचे रेकॉर्डिंग निवडणूक आयोगाला पाठवले आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रामदेव आणि भाजप उमेदवाराने सर्व आरोप नाकारले आहेत. पैशाच्या देवाण-घेवाणीची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे दोघांनीही म्हटले आहे.
राजकीय पक्ष माध्यमांमधून रामदेव बाबांवर हल्ला करत आहेत तर, सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवरुनही रामदेव बाबांच्या या कृत्यावर निशाणा साधला जात आहे. सोमनाथ भारती यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की 'रामदेव बाबांचा पोलखोल झाली आहे. स्वामी अग्निवेश यांच्या प्रमाणेच रामदेव बाबांनी भगव्या वस्त्रांचा अपमान केला आहे. भगव्या वस्त्रांचा अपमान आपल्याला थांबवावा लागणार आहे.'
काँग्रेसच्या कायदे विषयक समितीचे प्रमुख के.सी.मित्तल म्हणाले, आम्ही निवडणूक आयोगाकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मित्तल यांचा आरोप आहे, की निवडणूक काळात पैसे वाटणे आणि लाच देण्याचे हे प्रकरण आहे. विशेष म्हणेज दोन नंबरच्या पैशांचे हे प्रकरण आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, या लोकसभा निवडणुकीच्या सुरवातीपासून रामदेव बाबा परदेशातील काळेधन जो भारतात परत आणेल त्यांनाच पाठिंबा देण्याची भाषा करत आले आहेत.
गुरुवारी 12 राज्यातील मतदान संपल्यानंतर एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे. या व्हिडिओनुसार अलवर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार चांदनाथ रामदेव बाबा यांच्याशी पैशांची चर्चा करताना दिसतात. एका पत्रकार परिषदे दरम्यान चांदनाथ रामदेव बाबांना त्यांची मोठी रक्कम पकडली गेल्याचे सांगत असताना रामदेव बाबा त्यांचा हात दाबत तत्काळ म्हणतात, 'बावला है क्या, पैसे की बात यहां मत कर, मीडिया सुन रहा है।' बाबा असे बोलताच चांदनाथ यांना त्यांची चूक कळते आणि ते माध्यमांच्या प्रतिनिधींकडे पाहुन चेह-यावर बळजबरीचे हसू आणतात.
व्हिडिओमध्ये चांदनाथ रामदेव बाबांना सांगत असतात, 'पैसे आणण्यात फार अडचणी येत आहेत. त्यातच माझी मोठी रक्कम पकडली गेली आहे.' तेव्हाच रामदेव बाबा त्यांचे बोलणे मध्येच तोडतात.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, रामदेव बाबांचा 'पैशांचा व्हिडिओ'