आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kutch District Of Gujarat Issued A Notice To Arvind Kejriwal

केजरीवाल यांना गुजरात कोर्टाची नोटिस; 10 दिवसांत हजर होण्याचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुजरातमधील एका कोर्टाने आज (बुधवार) नोटीस बजावली आहे. कच्‍छ जिल्हातील एका कोर्टाने केजरीवाल यांना 10 दिवसांत हजर राहण्याने आदेश दिले आहे. केजरीवाल यांच्यावर गुजरात दौर्‍यात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, केजरीवाल वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहे. त्यामुळे ते सध्या प्रचारकार्यात व्यग्र आहेत.
केजरीवाल यांनी गेल्या महिन्यात गुजरातचा चार दिवसीय दौरा केला होता. यादरम्यान कच्‍छमधील गांधीधाममध्ये एका सभेत संबोधित करण्यासाठी लाउडस्‍पीकरचा वापर केला होता. लाउडस्‍पीकरसाठी केजरीवाल यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याप्रकरणी केजरीवाल यांना कोर्टाने नोटीस बजावली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा; वादाच्या भोवर्‍यात सापडला होता केजरीवालाचा गुजरात दौरा