आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ANALYSIS: या चार कारणांमुळे महत्त्वाचे आहे पाचव्या टप्प्यातील मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा 2014 च्या कोणत्याही टप्प्यातील निवडणुकीपेक्षा आजचा पाचवा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. तर, महाराष्ट्रातील हे दुस-या टप्प्यातील मतदान आहे. त्याची चार कारणे आहेत.
1 - लोकसभेच्या 22 टक्के जागांवर आज मतदान

17 एप्रिलच्या पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या एकूण जागांपैकी सर्वाधिक 22 टक्के जागांसाठी आज (गुरुवार) मतदान सुरु आहे. 12 राज्यातील 121 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान सुरु आहे. त्यासाठी 1769 उमेदवार रिंगणात आहेत. पुढील चार टप्प्यात 50 टक्के जागांवर मतदान होणार आहे. मात्र, आजच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात ज्या आघाडीच्या पारड्यात सर्वाधिक जागा जातील ते सत्तेच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे.
2 - कांटे की टक्कर
आज मतदान होत असलेल्या 121 जागांपैकी भाजप आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडे 46 जागा आहेत, तर काँग्रेसकडे 43 आहेत. त्यामुळे भाजपची लाट आहे की नाही, हे याच टप्प्यातील मतदानाने स्पष्ट होणार आहे. तर काँग्रेसपुढे असलेल्या जागा राखून आणखी यश मिळवण्याचे आव्हान आहे. काँग्रेसचे अनेक दिग्गज मंत्र्यांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे. त्यात गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वीरप्पा मोईली, गुलाम नबी आझाद, मल्लीकार्जून खरगे यांच्याशिवाय टीम राहुलचे महत्त्वाचे सदस्य आणि तरुण मंत्री सचिन पायलट यांचा समावेश आहे.
3 - आपची टेस्ट
कलंकित उमेदवारांमुळेही हा टप्पा विशेष लक्षणीय आहे. प्रस्थापित पक्षांपेक्षा आम्ही वेगळे आहोत असा दावा करणारी आम आदमी पार्टी देखील आता भारतीय राजकारणातील अपरिहार्यतेपासून मागे राहिलेली नाही. या टप्प्यात भाजपच्या 105 उमेदवारांपैकी 30 उमेदवारांवर विविध स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. कर्नाटकातील भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले येदियुरप्पा यांचे भवितव्यही आजच ठरणार आहे. तर काँग्रेस येथे भाजपच्या मागे आहे. त्यांच्या 101 उमेदवारांपैकी 22 कलंकित आहेत. बहुजन समाज पक्षाच्या 118 उमेदवारांपैकी 22 तर अपक्ष 860 पैकी 66 उमेदवार कलंकित आहेत. या उमेदवारांच्या जय-पराजया वरुनच सर्व सामान्य जनतेमध्ये कलंकित उमेदवारांबद्दल काय मत आहे ते स्पष्ट होणार आहे. आम आदमी पार्टी दिल्लीतील यशानंतर जनतेच्या कौतूकाचा विषय ठरली होती मात्र, केजरीवालांच्या तडकाफडकी राजीनाम्याने जनतेमध्ये त्यांची प्रतिमी खालवल्याचे अनेक सर्वेक्षणातून समोर आले आहे. आता आजच्या 121 मतदारसंघातील जनता त्यांचे स्थान नेमके कोणते हे ठरविणार आहे.
4 - दक्षिणेतील गणित
या टप्प्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कर्नाटकातील सर्वच्या सर्व जागांवर आजच मतदान होत आहे. त्यामुळे दक्षिणेतील समिकरण मतदान यंत्रबंद होणार आहे. येदियुरप्पांनी भाजपला सोडल्यानंतर पक्षाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली होती. आता ते परत स्वगृही परतले आहेत. मात्र, त्यांच्यावर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि काँग्रेससह स्वपक्षातूनच झालेला विरोध या सर्व परिस्थितीत ते भाजपला किती फायदा मिळवून देतात हे पाहाणे औत्सूक्याचे ठरणार आहे.