आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election Fifth Phase Voting Increased Election News

निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात विक्रमी मतदान, कोणत्या राज्यात कोणाला फायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात लोकांनी भरभरून मतदान केले आहे. आतापर्यंतच्या मतदानातील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. यात पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 79 टक्के मतदान झाले आहे. इतर राज्यांमध्येही 2009च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या वाढत्या मतदानाच्या टक्केवारीचा फायदा कोणाला होणार याचेही कयास लावले जात आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते वाढत्या मतदानाचा सर्वात मोठा फायदा सरळ भारतीय जनता पक्षाला होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तर, काही राज्यांमध्ये वाढलेल्या मतदानाची टक्केवारी स्थानिक पक्षांना फायदेशीर ठरणार आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष चांगली कामगिरी करतील.

राजस्थान मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आहे. या तिन्ही राज्यामध्ये भाजपचे सरकार आहे आणि येथे पहिल्यापासून मोदींची लाट असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे वाढत्या टक्केवारीचा फायदा भाजपला होणार असल्याचे बोलले जात आहे. त्याची काही कारणेही आहेत. त्यातील पहिले म्हणेज या तिन्ही राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुक झाली त्यात भाजपने चांगले यश संपादन केले होते. पाचव्या टप्प्यात वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय हे पुढील स्लाइडमध्ये समजून घेऊ या.
देशभरात कोणत्या राज्यात किती मतदान ?
राज्य जागा मतदान 2009
कर्नाटक 28 65.00 58.81
राजस्थान 20 63.25 48.40
महाराष्ट्र 19 61.81 50.71
उत्तर प्रदेश 11 63.00 47.78
ओडिशा 11 70.00 65.33
मध्य प्रदेश 10 54.00 51.16
बिहार 7 54.4 44.46
झारखंड 6 66.00 50.98
प. बंगाल 4 80.00 81.04
छत्तीसगड 3 65.00 55.28
काश्मीर 1 69.00 39.68
मणिपूर 1 74.00 77.14
2009 ची आकडेवारी संपूर्ण राज्याची आहे.