आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 121 Seats Up For Grabs In Next Phase Of LS Elections Today

मराठवाड्यातील सहा जागांसह राज्यात 19 जागांसाठी आज मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/मुंबई - नऊ टप्प्यांतील लोकसभा निवडणुकीत गुरुवारचा पाचवा टप्पा महत्त्वाचा असून, 12 राज्यांतील 121 जागांवर मतदान होणार आहे. गुरुवारी देशातील निम्म्या जागांवरील मतदान पूर्ण झालेले असेल. महाराष्ट्रातील मतदानाचा हा दुसरा टप्पा असून, त्यात मराठवाड्यातील सहा जागांसह राज्यात 19 जागांसाठी मतदान होत आहे. विदर्भात 10 एप्रिल रोजी झालेल्या मतदानात 2009च्या तुलनेत 10 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे गुरुवारीही किती टक्क्यांची वाढ होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. मराठवाड्याच्या सहा जागांवर 147 उमेदवार रिंगणात असून, 1 कोटी 2 लाख 84 हजार मतदार त्यांचे भवितव्य ठरवतील. औरंगाबाद जालन्यासह उर्वरित 19 जागांवर 24 रोजी मतदान होईल.

देशात चार टप्प्यांत 111 जागांसाठी, तर राज्यात विदर्भातील 10 जागांवर मतदान झाले. पाचव्या टप्प्यासाठी देशात 16.61 कोटी मतदार आहेत. मतदान होणार असलेल्या 12 राज्यांपैकी एकमेव कर्नाटकातच सर्वच्या सर्व म्हणजे 28 जागांवर मतदान आहे. ओडिशा विधानसभेच्या 77 जागांसाठीही उद्याच मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातील दिग्गज : सुशीलकुमार शिंदे (सोलापूर), गोपीनाथ मुंडे, सुरेश धस (बीड), अशोक चव्हाण (नांदेड), सुप्रिया सुळे (बारामती), प्रतीक पाटील (सांगली), पद्मसिंह पाटील (उस्मानाबाद), विजयसिंह मोहिते (माढा), राजू शेट्टी (हातकणंगले) आदी दिग्गजांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

राज्यनिहाय जागा व रिंगणातील दिग्गज
* कर्नाटक (28) - माजी पंतप्रधान देवेगौडा, वीरप्पा मोइली, नंदन निलेकणी.
* बिहार (07) - लालू कन्या मिसा, भाजपचे रामकृपाल यादव. शत्रुघ्न सिन्हा.
* उत्तर प्रदेश (11) - मनेका गांधी (पिलीभीत, भाजप)
* ओडिशा (11) - मंत्री श्रीकांत जेना, माजी मंत्री अर्जुन सेठी
* झारखंड (06) - यशवंत सिन्हांचे पुत्र जयंत, करिया मुंडा, सुबोधकांत सहाय.
* राजस्थान (20) - जसवंतसिंह व भाजपचे सोना राम व काँग्रेसचे सचिन पायलट.
* प. बंगाल (04) - भाजपचे एस.एस. अहलुवालिया, तृणमूलचे बायचुंग भुतिया.
* छत्तीसगड (03) - अजित जोगी, रमणसिंह यांचे पुत्र अभिषेकसिंह (भाजप)
* मध्य प्रदेश (10) - काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया.
* याशिवाय जम्मू-काश्मीर व मणिपुरात प्रत्येकी एक जागा.