आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमा मालिनी, स्मृती इराणी, जावेद जाफरी यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनची प्रसारण बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- चित्रपट अभिनेते हेमा मालिनी, जया प्रदा, नगमा, स्मृती इराणी, जावेद जाफरी यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनने प्रसारण बंदी घातली आहे. निवडणूक लढवित असल्याने या अभिनेत्यांच्या चित्रपटांवर निवडणूक काळात बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपटांना निवडणूक आचारासंहितेच्या कक्षेत आणण्यात आले आहेत. याचा मतदानावर परिणाम होतो, असे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रसारण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज बब्बर (कॉंग्रेस), नगमा (कॉंग्रेस) आणि जयाप्रदा (राष्ट्रीय लोकदल) यांच्या मतदारसंघात मतदान झाले असून हेमा मालिनी (भाजप), जावेद जाफरी (आम आदमी पार्टी) आणि स्मृती इराणी (भाजप) यांच्या मतदारसंघात मतदान व्हायचे आहे.
निवडणूक समितीच्या अधिकाऱ्याने माहिती दिली आहे, की टीव्हीवर दाखविण्यात येणारे कार्यक्रम आणि चित्रपटांचा लोकांवर थेट परिणाम होतो. अभिनेते जर निवडणूक लढवित असतील आणि त्यांचे कार्यक्रम सुरू असतील तर त्याचा त्यांना निवडणुकीत लाभ होऊ शकतो, असे निरिक्षण नोंदविण्यात आले आहे.