आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chidambaram Calls Modi Encounter Chief Minister News In Marathi

नरेंद्र मोदी एन्काऊंटर चीफ मिनिस्टर, चिदंबरम यांचा गंभीर आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम 'रिकाऊंटिंग मिनिस्टर' असल्याचा आरोप भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना चिदंबरम म्हणाले आहेत, की मोदी एन्काऊंटर चीफ मिनिस्टर आहेत.
रिकाऊंटिंग मिनिस्टर म्हणजे आपल्या कामाचा लेखाजोखा एकाद्या व्यक्तीला किंवा पक्षाला देणारा व्यक्ती असा होतो. नरेंद्र मोदी यांनी चिदंबरम यांना प्रचार सभांमध्ये वारंवार टार्गेट केले आहे. त्यांचा उल्लेख रिकाऊंटिंग मिनिस्टर असा केला आहे. त्यामुळे चिडलेल्या चिदंबरम यांनी म्हटले आहे, की नरेंद्र मोदी खोटारडे आहेत. मी रिकाऊंटिंग मिनिस्टर नाही. त्यांना याची कल्पना आहे. तरीही ते खोटे बोलत आहेत. तरी ते मला रिकाऊंटिंग मिनिस्टर म्हटत असतील तर मी त्यांना एन्काऊंटर चीफ मिनिस्टर म्हणेल.
नरेंद्र मोदी तमिळनाडू दौऱ्यावर असताना त्यांनी कॉंग्रेस नेते आणि सरकारवर जोरदार प्रहार केला होता. तेव्हा मोदी म्हणाले होते, की तमिळनाडूत कॉंग्रेस सरकारमधील एक रिकाऊंटिंग मिनिस्टर आहेत. निवडणुकीला घाबरून ते पळून गेले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा झालेला विजय वादग्रस्त आहे. यावर न्यायालयात सुनावणीही सुरू आहे.