आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Telecom Minister A Raja News In Divya Marathi

'राजा'च दोन्हीकडे; एकीकडे 2-जी वाले, तर दुसरीकडे कनवाळू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनतेमध्ये मिसळताच राजा म्हणतात, वणक्कम (नमस्कार) मी आपल्यात आलो आहे. जयललिता माझ्यावर 2-जी घोटाळ्याचा आरोप करीत आहेत. परंतु, मी फक्त तुम्हाला मानतो. तुम्हीच माझा न्याय कराल.

नीलगिरी - चाळीस डिग्री सेल्सियस तपमानात तापलेल्या तामिळनाडूत जर कोणती जागा थोडा गारवा देणारी असेल तर ती आहे उटी. देशभरातून आलेल्या पर्यटकांच्या वर्दळीने समृद्ध उटीतील सर्वात मोठा ब्लॅक थंडर रिसॉर्टमधील सूट नंबर एक ए. राजा यांच्यासाठी आरक्षित आहे. परंतु, ते येथे आराम करण्यासाठी आलेले नाहीत. 2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचे प्रमुख आरोपी आणि डीएमके उमेदवाराचा हा निवडणूक मतदारसंघ आहे, जेथे गारव्यातही त्यांना घाम फुटत आहे.

सकाळचे नऊ वाजले आहेत, केळी व नारळाच्या झाडांनी बहरलेल्या हिरवाईत हरवलेल्या रिसॉर्टमध्ये त्यांच्या खोलीच्या दरवाजाबाहेर मोठमोठय़ा गाड्यांचा ताफा लागलेला आहे. आत सोफ्यावर बसलेले राजा यांच्यासमोर काही लोक हात बांधून उभे आहेत. प्रचारास निघण्यापूर्वीच ते शेवटच्या सूचना करीत आहेत. हे लोक राजा यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नव्हेत, तर त्यांचे कुशल निवडणूक नियंत्रक आहेत. कार्यकर्ते तर एक किलोमीटर दूरवरील त्या बंगल्यात तैनात आहेत, जेथे राजा यांचे ऑफिस आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ना येथे येण्याची गरज आहे, ना परवानगी घेण्याची. राजा अचानक बाहेर येतात, पांढर्‍या रंगाच्या मोटारीत ते बसतात. आठ गाड्यांच्या ताफ्यातील एका मोटारीत राजा यांचे निकटवर्तीय शिवाकडे विशेष जबाबदारी आहे, प्रचाराच्या ताज्या प्रतिमांनी नीलगिरीच्या खासदाराचे फेसबुक अपडेट करीत राहणे. राजा एक महिन्यापासून येथे तळ ठोकून आहेत. पेरम्बलूरचे राहणारे राजा यांचे तीन भाऊ व सगळे नातवाइक येथे आलेले आहेत. राजांची फळी सगळी गावे व गल्ल्या पालथ्या घालत आहे. 2-जी चा प्रचंड असा दबाव स्पष्टपणे दिसून येतो आहे. चार रंगीत पानांवर भावनिक अपील केलेले आहे. मोठय़ा अक्षरात लिहिलेले आहे, आपल्या न्यायालयात माझा फैसला. मुखपृष्ठावरील छायाचित्र राजा यांच्या अटकेच्या वेळचे आहे. ते म्हणतात, मी तर निदरेष आहे, लोकशाहीच्या सर्वात मोठय़ा न्यायालयात मी न्याय मागायला निघालो आहे.

अनुसूचित जातीसाठी सुरक्षित अशा या जागेवरून राजा 2009 मध्ये 85 हजार मतांनी जिंकले होते. आता मतदारांचे सरळसरळ विभाजन स्पष्ट आहे. एका बाजूला शहरी भागातील सुशिक्षित, नोकरदार, विद्यार्थी व युवक, जे 2-जी घोटाळ्याला एक कलंक मानतात. त्यापैकी प्रत्येकाने राजाला हरविण्यासाठी कंबर कसलेली आहे. दुसरीकडे कमी उत्पन्न असलेला वर्ग. भाजीपाला, फळे व नारळपाणी विकणारे, रिक्षाचालक व मजूर आणि गावाकडील लोक. राजाच्या दानशूरपणाचे त्यांच्यात अनेक किस्से आहेत. व्यवसायाने टेलर रवी चंद्रन यांची पत्नी आणि मुले पर्वतीय नदीच्या पुरात वाहून गेले होते. मृतदेह मिळून आले होते. दु:ख सांगण्यासाठी ते राजाकडे आले. एक लाखाची मदत लगेचच मिळाली. या दिवसात ते शिलाईचे काम सोडून राजांचा ध्वज घेऊन फिरत आहेत. हसनच्या भावाचा अपघात झाला होता.

राजा गल्लीबोळातील त्याच्या घरात गेले. उपचार केले. हसन व त्याच्या भावांची छाती अजूनही फुललेली आहे. राजाच्या दरवाजावर जो कोणी आला, खाली हाताने कधीच गेलेला नाही. रवी चंद्रन म्हणतात, आम्हाला आणखी हवंय तरी काय? भाजपचे उमेदवार एस. गुरुमूर्ती यांचा अर्ज अवैध ठरला आहे. एआईएडीएमके उमेदवार गोपालकृष्णन चांगली टक्कर देत आहेत. मुख्यमंत्री जे. जयललिता ज्या दोन जागांवरून पूर्णत: विजय इच्छित आहेत, त्यामध्ये चिदंबरम यांच्या शिवगंगाखेरीज दुसरा मतदारसंघ हाच आहे. त्यांच्या सभेने वातावरण तापले आहे खरे; पण सगळ्यात जास्त चर्चा तर डीएमकेचे सर्वेसर्वा करुणानिधी यांच्या सभेची आहे.

करुणानिधींनी राजाला मत देण्याचे अपील गुड गवर्नेसच्या वचनांनिशी केले. लोक उपेक्षेने म्हणत आहेत की, त्यांच्या गुड गवर्नेसचा 2-जी हून अधिक मोठा पुरावा असेल तर सांगा की..

पुढे वाचा, मला टेलिकॉम क्रांतीसाठी आठवणीत ठेवा...