आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दुसरा टप्पा : मतदानात 7.94 टक्के वाढ; मराठवाडा विदर्भाच्या निम्माच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकीचा देशातील पाचवा व राज्यातील दुसरा टप्पा गुरुवारी शांततेत पार पडला. महाराष्ट्रात 19 जागांवर 62.70 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2009च्या निवडणुकीत येथे झालेल्या 54.24 टक्के मतदानाच्या तुलनेत ही वाढ सरासरी 7.94 टक्के आहे. मराठवाड्यात मात्र विदर्भात गेल्या गुरुवारी झालेल्या मतदानाच्या तुलनेत निम्मीच वाढ दिसते. विभागात 6 जागांवर गेल्या वेळच्या तुलनेत 5.41 टक्के वाढ झाली. विदर्भात ही वाढ 10 टक्के होती. पुणे आणि मावळमध्ये 18 टक्क्यांनी मतदान वाढले. देशाच्या 12 राज्यांतील मतदानात राजस्थान 15 टक्क्यांची विक्रमी वाढ नोंदली गेली.

राज्यात कोल्हापूरमध्ये सर्वाधिक 68 टक्के, तर सातारा व सोलापुरात सर्वात कमी 57 टक्के मतदान झाले. बारामती, मावळ, पुणे व शिरूर मतदारसंघात गेल्या लोकसभेच्या तुलनेत यंदाच्या मतदानाच्या टक्केवारीत भरीव वाढ झाली आहे. या टप्प्यात राज्यात 358 उमेदवार रिंगणात होते. बीडमध्ये एका टक्क्याची घट झाली. परभणी, सांगली, बारामती, नगर, शिर्डी, नांदेड व सोलापूर येथे आठ ते दहा टक्क्यांची वाढ दिसते.

पुढचा टप्पा 24 रोजी : राज्यात मतदानाचा पुढील टप्पा 24 रोजी आहे. यात औरंगाबाद, जालन्यासह मुंबई, उत्तर महाराष्ट्र व खान्देशातील उर्वरित 19 जागा. विदर्भात 10 जागांवर 10 एप्रिल रोजीच मतदान झाले आहे.

बीड मतदारसंघात मतदानाचे प्रमाण एक टक्क्याने घसरले. गेल्या वेळी 65.06 टक्केवारी असलेल्या बीडमध्ये या वेळी सरासरी 64 टक्के मतदान झाले. या टप्प्यात राज्यात सर्वाधिक म्हणजे 39 उमेदवार बीडमध्येच रिंगणात होते. या ठिकाणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे राज्यमंत्री सुरेश धस यांच्यात लढत आहे.

विदर्भात होती 10 टक्क्यांची वाढ
मराठवाड्यात बीड, लातूर, नांदेड, हिंगोली उस्मानाबाद, परभणी येथे गुरुवारी मतदान झाले. या जागांवर गेल्या वेळी 57.59 टक्के मतदान होते. या वेळी ही टक्केवारी 63 वर जाते. त्यानुसार 5.41 टक्के वाढ दिसते. विदर्भात 10 एप्रिल रोजी 10 जागांवरील मतदानात 10 टक्के वाढ नोंदली गेली होती.
(फोटो : बीड जिल्ह्यातील नाथ्रा या मूळ गावी सहकुटुंब मतदान केल्यानंतर गोपीनाथ मुंडे.)

राज्यातील मतदानाची टक्केवारी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोवर क्लिक करा...