आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्यांच्याकडे सर्व निर्णय घेणारी एकच व्यक्ती - प्रियंका गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायबरेली - प्रियंका गांधींनी आईच्या मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली. बुधवारी रायबरेलीत सभा घेतल्या. नरेंद्र मोदी आणि भाजप त्यांच्या निशाण्यावर होते.

'सत्ता जनतेच्या हातात यावी अशी आमची इच्छा आहे. त्यांची विचारप्रणाली एक व्यक्तिकेंद्रित आहे. एक व्यक्तीच सर्व निर्णय घेईल. जेवढ्या योजना, उपक्रम आहेत, ते सगळे केवळ निवडून आलेल्या व्यक्तींकडेच असतील.'

अधिकारांचा विश्वास
‘मी काही वर्षांपूर्वी अमेठीमध्ये गेले होते. 82 वर्षांच्या एका महिलेने बँकेत खाते सुरू केले. स्वत: त्यावर सही केली होती. ती महिला म्हणाली होती, मला राहुल गांधींनी एवढा आत्मविश्वास दिला की, या वयात मी शिक्षण घेत आहे. अशा प्रकारे जेव्हा व्यक्तीला आपल्या अधिकारांवर विश्वास असतो तेव्हा त्यामध्ये विकासाची आशा निर्माण होते. हा विचार करून निर्णय घ्या. ’

निवडणूक सोनियांची नाही
‘तुम्ही निर्णय घेताना हे लक्षात ठेवा की, तुम्ही नेहमी शांती अनुभवली आहे. काँग्रेसची विचारप्रणाली एकतेची आहे. विरोधकांची विचारप्रणाली काही मोजक्या लोकांना पुढे सारण्याची आहे. ते इतरांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. ही निवडणूक केवळ सोनिया गांधींची नाही. देशाच्या भवितव्याची आहे. जनता सर्वात समजदार आहे.’