आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुर्चीसाठी भाजपने ओलांडल्या मर्यादा - सोनिया गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबिकापूर/ नीमच - सोनिया गांधी यांनी छत्तीसगडमध्ये प्रचार सभा घेतल्या. सरगुजामध्ये त्या म्हणाल्या की, पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा चिंतेचा विषय आहे.

"ते (भाजप) केवळ खुर्चीच्या मागे पळतात. कधी- कधी त्यांची भूक एवढी वाढते की ते खुर्चीसाठी कोणत्याही थरापर्यंत जायला तयार होतात. पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी भाजपने सर्वा सीमा आणि मर्यादा ओलांडण्यात जराही कसूर केलेली नाही. ते पाहता आमच्या लोकशीहीचे काय होणार, ही चिंता सतावू लागते आहे. जिंकून येण्यासाठी काहीही करणे, खर्‍याचे खोटे करण्यामुळे आमची लोकशीही अबाधित राहील काय?"

आम्ही भेदभाव करत नाही
‘कोणत्याही देशाची लोकशाही एका व्यक्तीच्या हाती सुरक्षित राहू शकत नाही, एवढे मला पक्के माहीत आहे. तुम्हाला सावधपणे निर्णय घ्यायचा आहे. आम्ही समाजातील सर्व घटकांसाठी महत्त्वाची पावले उचलली आहे. आमच्या सरकारने कधीही भेदभाव केला नाही. कोणत्या राज्यात कोणाचे सरकार आहे, हेही पाहिले नाही.’

भाजप काहीच करत नाही
‘भाजप सरकार छत्तीसगडमध्ये काहीही करत नाही. सुरक्षेसाठी कोट्यवधी रुपये दिले. तरीही जनता सुरक्षित नाही. केंद्रामध्ये आमचे पुन्हा सरकार आले, तर आम्ही आणखी कायदे करू. आम्ही सत्तेत आलो तर सर्व घटकांवर रुग्णालयात मोफत उपचार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’