आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडीवरून निघाली होती मोदींची वरात; फक्त एका दिवसासाठी आले होते घरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडनगर- गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे महिसाणा ‍जिल्ह्यातील वडनगर येथील रहिवासी आहेत. नरेंद्र मोदी हे विवाहित असल्याच्या मुद्यावरुन विरोधक राजकारण करताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर मोदींवर खोचक शब्दात टीकाही सुरु केली आहे. मोदी यांच्या वैवाहिक जीवनाबाबत चौफेर चर्चा रंगली असताना लेखिका कालिंदी रांदेरी यांनी मोदींच्या विवाहाबाबत अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा खुलासा केला आहे. कालिंदी रांदेरी मोदींच्या वैवाहीक जीवनावर पुस्तक लिहित आहेत.

कालिंदी रांदेरी यांच्या मते, मोदी 12 वर्षांचे असताना त्यांच्या घरी एक साधू आले होते. या साधूने मोदींची भविष्यवाणी सांगितली होती. मोदींच्या मातोश्री हिराबा यांना साधूने दोन्ही मुलांची कुंडली मागितल्या होत्या. हिराबांनी नरेंद्र मोदींसह त्यांचे मोठे बंधू सोमभाई यांची कुंडली दाखवताच साधूंनी भविष्यवाणी कथन केली होती.

सोमभाईंचे कुंडली पाहात साधू म्हणजे, याचे जीवन साधारण राहिल परंतु लहान मुलगा नरेंद्र मोदींच्या जीवनात अनेक चढ-उतार असतील. मात्र, एके दिवशी हा मुलगा मोठं यश संपादन करेल. देशाचे नेतृत्त्व करेल. तसेच शंकराचार्य यांच्याप्रमाणे महान संताची सिद्धीही प्राप्त करेल.

या दरम्यान मोदी आपला जास्तीत जास्त वेळळ पूजा-पाठ करण्यात घालवत असत. सकाळ- संध्याकाळ परमेश्वराची आराधना करत असत. मोदींचे वर्तन पाहून साधूची भविष्यवाणी खरी होत तर तर नाही ना, या भीतीने मोदीची आई अस्वस्थ झाल्या. सगळ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोदी कोणाचेही ऐकत नव्हते. त्यामुळे मोदींचा विवाह केला तर त्यांना या सगळ्या गोष्टींचा विसर पडेल. असे त्यांच्या कुटूंबियांना वाटत होते. विवाहानंतर मोदी कौंटूबिक जीवनात रमतील आणि त्यांच्या डोक्यातून साधू बनण्याचे धूत‍ निघून जाईल, म्हणून 'जशोदाबेन'शी मोदींचा विवाह निश्चित करण्यात आला. विवाहच्यावेळी मोदी 15 वर्षांचे होते. बैलगाडीवरून मोदीं वरात निघाली होती. या काळात बालविवाह होत असत. विशेष म्हणजे कुटूंबियांनी घेतलेल्या निर्णयाला मुले सहसा विरोध करत नसत...

पुढील स्लाइडवरवाचा, मोदींची विवाहाबाबत महत्त्वपूर्ण गोष्टी...