आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mulayam Soft On Rapists, Tough On Riot Victims: Narendra Modi, News In Divya Marathi

जेथे मुलायम व्हायला हवे, तेथे कठोर होतात नेताजी - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर / इटावा - नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावामध्ये सभा घेतल्या. यूपीत समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांच्यावर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. रुग्णशय्येवरील सरकार नको असेल, तर भाजपला मत द्या, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

"नेताजी (मुलायम सिंह) वार्‍याची दिशा ओळखा. नेताजींमध्ये एक उणीव आहे. जेथे मुलायम व्हायला हवे, तेथे ते कठोर होतात. जेथे कठोर व्हायला हवे, तेथे ते मुलायम होतात. बलात्कार्‍यांना शिक्षा होण्याच्या प्रकरणात नेताजींनी कठोर होण्याची गरज आहे, परंतु ते मुलायम झाले आहेत. धार्मिक दंगली झाल्या. सुरक्षा छावणीत छोट्या-छोट्या मुलांचे मृत्यू होत होते. त्या वेळी नेताजींनी मुलायम होणे गरजेचे होते. मुलांच्या जीवनाची काळजी वाहायला होती, परंतु त्यांना ते जमले नाही."

चार मंत्र्यांची नावे उजेडात आणा
आयकर विभागाकडे साडेतीनशे तासांचे संभाषण टॅप आहे. हे काम केवळ मीट एक्स्पोर्टपुरते नव्हते, असे एका टीव्ही वाहिनीचे म्हणणे आहे, एक मोठे हवाला रॅकेट होते. केंद्राचे चार मंत्री मीट निर्यात करणार्‍या कंपनीशी संबंधित होते. 10 जनपथचे निकटवर्तीय एक नेतादेखील त्यात सामील आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्या नेत्याचादेखील मीट एक्स्पोर्टसह हवालाचा मोठा कारभार चालवला जात आहे. सत्य बाहेर यायला हवे. देशाला हे कळले पाहिजे. हे मंत्री कोण आहेत, त्यांची नावे उजेडात यायला हवीत.

वाघ मागितला, गायदेखील मागायला हवी होती
मला मुख्यमंत्र्यांना (अखिलेश यादव) सांगायचे की, तुम्ही गुजरातकडून वाघ मागितला. त्यांनी वाघासोबत गायदेखील मागितली असती, तर मला चांगले वाटले असते. भगवान श्रीकृष्ण माझ्या द्वारका नगरीत येऊन राहिले. यादववंशाचे लोक तेथे गीर गायीचे संवर्धन करत होते. जर नेताजींनी गीरची गाय मागितली असती, तर माझ्या यादववंशी बांधवांची आर्थिक उन्नती झाली असती.

एका कुटुंबाकडून सुटका करा
जर आज देशाचे भाग्य बदलायचे असेल, तर प्रबळ इच्छाशक्ती असलेले सरकार हवे. असे सरकारच देशाला बळकटी देऊ शकते. जास्तीत जास्त मतदान करून 300 हून अधिक कमळ दिल्लीत पाठवा. देशाला बळकट करण्यासाठी मजबूत सरकार बनवले पाहिजे. दिल्ली आणि लखनऊची एका कुटुंबापासून मुक्तता केली पाहिजे.