आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Criticized On Mulayam Singh News In Marathi

बलात्काऱ्यांवर 'मुलायम', दंगलग्रस्तांवर कठोर, समाजवादीच्या बालेकिल्ल्यात मोदींचा हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटवाह (उत्तर प्रदेश)- समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव बलात्काऱ्यांवर 'मुलायम' तर मुजफ्फरनगर दंगलग्रस्तांवर कठोर बोलतात, असे म्हणत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी समाजवादी पक्षाच्या बालेकिल्ल्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुलायमसिंह यांचे मुळ गाव सईफाई इटवाहमध्ये आहे. येथील प्रचार सभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले, की आमच्या नेताजींना प्रॉब्लेम आहे. जेथे कडक बोलायला हवे तेथे मुलायम बोलतात तर जेथे मुलायम बोलायला हवे तेथे कठोर वक्तव्ये करतात. बलात्कारांच्या विषयावर ते मुलायम बोलतात तर मुजफ्फरनगर मदत शिबिरांमध्ये होणाऱ्या मुलांच्या मृत्यूंवर कठोर बोलतात. उत्तर प्रदेशच्या जनतेला केंद्रात आणि राज्यात बदल झाल्याशिवाय विकास दिसणार नाही.
गेल्या सप्टेंबर महिन्यात मुजफ्फरनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतर आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप समाजवादी पक्षावर लावण्यात आले आहेत. या आरोपांमधून बाहेर निघत नाहित तोच योग्य सोई-सुविधा नसल्याने मदत शिबिरांमधील मुले मृत्युमुखी पडत असल्याचे उघडकीस आले होते. यावर बोलताना मुलायमसिंह म्हणाले होते, की या मदत शिबिरांमध्ये राजकीय लोक राहत असून दंगडपीडित नाहीत.