आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयाचे 15 पैसे करणारा असा कोणता पंजा होता - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रतलाम - नरेंद्र मोदी बुधवारी मध्यप्रदेशात होते. त्यांनी ‘जनतेपर्यंत एक रुपयातील केवळ 15 पैसेच पोहोचतात ’ या माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या वक्तव्याच्या आडून काँग्रेसवर पलटवार केला आणि ज्येष्ठ मतदारच देशाचे चित्र बदलू शकतात, असे म्हटले आहे.

‘राजीव गांधींच्या कार्यकाळात पंचायत राजपासून ते संसदेपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेसच होती. तेव्हा राजीव गांधी म्हणाले होते की, ‘आम्ही एक रुपया पाठवतो परंतु गरिबांपर्यंत केवळ 15 पैसेच पोहोचतात. एक रुपयाला घासून घासून 15 पैसे करणारा असा तो कोणता पंजा होता, हे देशाला जाणून घ्यायचे आहे. हा मोठा प्रश्न असून काँग्रेसवाल्यांकडून देशाला ते माहीत करून घ्यायचे आहे.’’

ज्येष्ठ मतदारच काँग्रेसला बेदखल करतील
काँग्रेसला सत्तेतून बेदखल करण्याचे काम तर ज्येष्ठ मतदारच करतील. परंतु देशात भक्कम आणि स्थिर सरकार स्थापायचे आहे, त्यासाठी युवा मतदारांना प्रयत्न करावे लागतील. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे, तेथील जनता सुखी आहे. त्यामुळेच मतदार वारंवार भाजपला निवडून देऊ लागले आहेत. काँग्रेसचे राज्य होते तेव्हा मध्य प्रदेश आजारी राज्य होते. भाजप सरकारच्या प्रयत्नांमुळे आता ते आघाडीचे राज्य बनले आहे.’

देशाच्या तिजोरीवर आता पंजा पडू देणार नाही
देशाच्या तिजोरीवर आता पंजा पडू दिला जाणार नाही. देशाच्या संपत्तीवर गरीब आणि आदिवासींचा हक्क आहे. तो कुणालाही हिरावू दिला जाणार नाही. देशात भाजपचे सरकार येताच आदिवासींच्या हिताचे काम करू. त्यांच्यासाठी आम्ही योजना आणू. त्यांच्या हक्कांची जपणूक करू.’