आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने ऐकायला पाहिजे असा पंतप्रधान आज देशाला हवा - नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामनाथपुरम(तामिळनाडू) - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी सलग दोन दिवस तामिळनाडूमध्ये होते. रामनाथपुरम, एरोड आणि कन्याकुमारीमध्ये त्यांनी सभा घेतल्या. यात ते म्हणाले, निवडणूक उत्तरदायित्व निभावणार्‍या पंतप्रधानांसाठी आहे. ज्यांचे सरकारने ऐकायला पाहिजे असा पंतप्रधान देशाला हवा आहे.

‘‘ मॅडम (सोनिया गांधी) अम्मांना(जे.जयललिता) दोषी ठरवत आहेत आणि अम्मा मॅडम यांना. कोणीच त्यांचे ऐकण्यास तयार नाही. दिल्लीतील केंद्र सरकार झोपलेले आहे. त्यांना लोकांच्या समस्यांशी देणेघेणे नाही. दोन्ही प्रमुख प्रादेशिक पक्ष द्रमुक आणि अण्णा द्रमुक राज्यासाठी काही करू शकले नाही.’’ (मोदींचा इशारा तामिळनाडूच्या मच्छिमारांवर श्रीलंकेकडून होणार्‍या गोळीबाराच्या दिशेने होता. त्यांनी या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारांवर निशाणा साधला.)

गंगा-कावेरी जोडणार
पूर आणि पाण्याची समस्या कमी करण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात नदीजोड प्रकल्प योजना सुरू केली होती. लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी नद्या जोडणे आवश्यक आहे. एनडीएचे सरकार आल्यास आम्ही गंगा-कावेरी जोडू.

फटाका उद्योगाची काळजी
‘शिवाकाशीमध्ये फटाका उद्योगाच्या समस्या आहेत. लाखो मजुरांना रोजगार हवा आहे.परवाना शुल्कवाढीमुळे उद्योगात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी यूपीएचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. आम्ही सत्तेवर आल्यास फटाका उद्योगाच्या कल्याणासाठी पावले उचलू.’

काँग्रेसने आश्वासन मोडले
‘काँग्रेस सरकारने 15 सूत्री कार्यक्रम तयार केला होता. मुसिलम तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. मुस्लिमांच्या स्थितीत काहीच बदल झाला नाही.

उमा यांनी मोदींना विनाश पुरुष ठरवल्याची सीडी बाहेर
नवी दिल्ली - काँग्रेसने तीन वर्षे जुनी व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली आहे. यामध्ये उमा भारती यांनी नरेंद्र मोदी यांना विकास पुरुष नव्हे तर विनाश पुरुष संबोधले होते. गुजरात विकासाचा दावा दांभिकता असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. उमा तेव्हा भारतीय जनशक्ती पार्टीच्या अध्यक्षा होत्या. यामध्ये त्या म्हणाल्या, हिंदूंना गुजरातमध्ये हिंदूंना जेवढे भयभीत पाहिले तेवढे अन्य भागात नाही. गुजरात आता भयग्रस्त राज्य बनले आहे.