आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मनिरपेक्षतेचे राजकारण करणार नाही : नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वाराणसीत एकीकडे मतांचे ध्रुवीकरण केले जात असताना नरेंद्र मोदींनी मात्र ‘वेळप्रसंगी पराभव चालेल, परंतु धर्मनिरपेक्षतेच्या नावावर राजकारण करणार नाही’, असा ठाम निर्धार व्यक्त केला. केवळ बडोदा किंवा वाराणसीसाठी नव्हे, देशासाठीच कार्य करू, असेही मोदी म्हणाले.

शुक्रवारी एका व्यापारविषयक वाहिनीवर मुलाखतीत ते बोलत होते. यात त्यांना बहुतांश आर्थिक विषयाशी संबंधित प्रश्नच विचारण्यात आले.

मंत्रालयाविषयी : नरेंद्र मोदी म्हणाले तुम्ही शर्ट-पँट घालता की थ्री पीस याला महत्त्वच नाही. एक फाईल 40 टेबलावरून प्रवास करतेच. यावर गुजरातमध्ये आम्ही एक खिडकी योजना सुरू केली. एक दिवसांत निपटारा व्हावा, अशी सोय विकसित केली. सकाळी कुणी अर्ज दिला तर सायंकाळी त्याचे काम झालेले असते. देशासाठी जे काही करायचे आहे त्यात माझ्यावर कुणाचाही दबाव असणार नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातला आम्ही तोट्यातून बाहेर काढले. चोवीस तास वीज दिली. कोल इंडियातही हे बदल दिसू शकतील.

मंत्रालयांची वाटणी
कुणावर कोणते मंत्रालय सोपवायचे यावर आताच चर्चा करणे घाईचे ठरेल. रेल्वे हा विकास प्रक्रियेतील प्रमुख धागा आहे. यात आपण फक्त प्रवासी सेवा एवढाच विचार करतो. हे जाळे आपण केंद्र व राज्यांच्या विकासाशी जोडू शकतो, असे मोदी म्हणाले.
वाराणसी-बडोद्यासाठी नव्हे, देशासाठीच कार्य