आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi And Rahul Gandhi Indian Election 2014 And International Media

राहुल गांधींना सतावतेय पराभवाची भीती; वाचा इंटरनॅशनल मीडिया कव्हरेज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ब्रिटनमधील सगळ्यात मोठा मीडिया ग्रुप 'बीबीसी'नुसार, 16 लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर संपूर्ण पक्षाची मदार आहे. 'बीबीसी' उत्तर प्रदेशातील निवडणूक स्थितीचा आढावा घेतला आहे. 'बीबीसी'च्या अहवालानुसार राहुल गांधी सध्या प्रचंड तणावात दिसत आहेत. राहुल यांच्या चेहर्‍यावर पराभवाची भीती स्पष्ट जाणवत आहे.
'यूएई'मधून प्रसिद्ध होणारे इंग्रजी वृत्तपत्र 'खलीज टाइम्स'ने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमने उधळली आहेत. मोदी पंतप्रधान बनले तर भारत अधिक आर्थिक सक्षम होईल. तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ते प्रयत्नशिल राहतील, असे 'खलीज टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. भारतात नऊ टप्प्यात मतदान होत आहे. त्यापैकी बहुतेक राज्यात मतदान झाले आहे. आतापर्यंत भाजपने आघाडी घेतल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
पाकिस्तानातून प्रसिद्ध होणारा 'द डॉन'ने नरेंद्र मोदींचे खास स्नेही अमित शहा यांच्यावर भाषणबंदी केंद्रीय निवडणूक आयोगाने उठवल्याच्या वृत्ताला प्राधान्य दिले आहे. उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रचार प्रभारी शहा पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
पुढील स्लाइड्‍सवर पाहा, इंटरनॅशनल मीडिया कव्हरेज...