आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदीजी, भारताला उल्लू बनवणे बंद करा - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किशनगंज - राहुल गांधी बुधवारी बिहारमध्ये होते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला येथे केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. किशनगंजच्या रॅलीत राहुल यांनी मोदींवर थेट हल्ला केला. त्यांनी देशाला मूर्ख बनवणे थांबवावे असे ते म्हणाले.

'मोदीजी, देशाला मूर्ख बनवणे बंद करा. तुम्ही बिहारच्या लोकांना मूर्ख बनवू शकत नाही. बिहारमध्ये बिहारचेच मॉडेल चालेल. येथे तुमच्या गुजरातचे मॉडेल चालणार नाही. बिहारच्या लोकांना सर्व काही माहिती आहे. तुम्ही गुजरातमध्ये गरीब शेतकर्‍यांची 43 हजार एकर जमीन कंपन्यांना दिली. पूर्णिया शहराच्या आकाराएवढी जमीन तुम्ही 300 कोटी रुपयांत दिली. त्याचा दर एक रुपया मीटर होता. चॉकलेट खा आणि मजा करा.'

निवडणूक फक्त मोदींसाठी
‘त्यांच्याकडे केवळ एक व्यक्ती आहे, जिला सर्वकाही माहिती आहे. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये जे होत आहे, ते सर्व त्यांना माहिती आहे. त्यांच्या मते निवडणुका देशासाठी नव्हे, नरेंद्र मोदींसाठी होत आहेत. हीच त्यांची विचारप्रणाली आहे. जनतेने 60 वर्षे घाम गाळून गुजरातचा विकास केला. पण तसे नाही... गुजरातचा विकास झाला तो केवळ नरेंद्र मोदींमुळेच...! ’

प्रत्येक भाषणात विष
‘आम्ही सगळ्यांशी प्रेमाने, आदराने बोलतो. दुसरीकडे भाजपचे नेते आहेत. ते हिंदूंचे मुस्लिमांबरोबर आणि महाराष्ट्रातील जनतेचे बिहारमधील जनतेबरोबर भांडण लावतात. कर्नाटकात महिलांना मारहाण करतात. त्यांची भाषणे ऐका. एकही असे भाषण नाही, ज्यामध्ये त्यांच्या विखारी वक्तव्याचा समावेश नसेल.’