आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना सबलीकरण नव्हे,सन्मान देण्याची खरी गरज - राहुल गांधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खांडवा/कोरबा - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मध्य प्रदेशातील खांडवा आणि छत्तीसगडमधील कोरबा येथे सभा घेतली. महिलांना सबलीकरणापेक्षा सन्मान देण्याची अधिक गरज आहे.

आम्हाला राग येत नाही
आम्हाला राग येत नाही. माझे, सोनियाजी आणि पंतप्रधानांचे भाषण तुम्ही ऐकले असेल. आम्ही विरोधी पक्षासोबतदेखील रागात बोलत नाहीत. त्यांच्या (नरेंद्र मोदी) भाषणात राग असतो. ते काँग्रेसला मुळासकट उखडण्याची भाषा करतात. आम्ही असे अजिबात बोलत नाहीत. त्यांचे ज्येष्ठ नेते अडवाणी आहेत. ते अडवाणींचाही आदर करत नाहीत आणि अदानी यांना मात्र मोफत जमीन देऊन टाकतात.