आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Targets Narendra Modi News In Marathi

मोदीजी भारताला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, राहुल गांधी यांचा जोरदार हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशनगंज (बिहार)- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव घेऊन शाब्दिक हल्ला चढविला. गुजरातचे विकासाचे मॉडेल फसवे आणि वाढवून चढवून दाखविण्यात येत आहे, असे सांगत राहुल गांधी म्हणाले, की मोदीजी भारताला मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका.
राहुल गांधी म्हणाले, की प्रत्येक नॅनो कार तयार करण्यासाठी गुजरात सरकार टाटाला जवळपास 40,000 रुपये देत आहे. गुजरातच्या जनतेचा हा पैसा आहे. मोठ्या उद्योजकांचे हित जपण्यासाठी मोदींनी जनतेच्या पैशांची चक्क लूट चालविली आहे. गुजरातच्या विकासाचे मॉडेल सादर करून मोदी आपला प्रचार करीत आहेत. परंतु, मुळात हे मॉडेलच फसवे आणि वाढवून चढवून दाखविण्यात आले आहे.
64 वर्षीय नरेंद्र मोदी यांनी एका दशकात भारताचा विकास दर वाढविण्याचे आश्वासन जनतेला दिले आहे. त्यासाठी गुजरातमध्ये होत असलेल्या विदेशी आणि देशांतर्गत गुंतवणुकीचा हवाला दिला जात आहे. याच बळावर मोदींना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, राहुल गांधी यांनी या मॉडेलवर प्रहार करीत मोदींच्या विकासालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.