Home | National | Other State | Education Arrangement for the children of workers; 1 and half crore people in Prayagraj for Shahi Snan

श्रमिकांच्या मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था, तिसऱ्या शाही स्नानासाठी 1.5 कोटी भाविकांची मांदियाळी

रवी श्रीवास्तव | Update - Feb 11, 2019, 10:10 AM IST

कुंभामध्ये कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी ५ शाळा, शिक्षक ने-आण करतात, नंतर अध्यापनही

 • Education Arrangement for the children of workers; 1 and half crore people in Prayagraj for Shahi Snan

  प्रयागराज- प्रयागराज येथील कुंभ देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांचे श्रद्धास्थान आहेच, त्याचबरोबर पाहुण्यांच्या स्वागतात गुंतलेले सफाई कामगार व मजुरांच्या मुलांसाठीदेखील आनदंदायी ठरला. कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी सरकारने पहिल्यांदा पाच अस्थायी प्राथमिक शाळा सुरू केल्या. मुले शिकू लागल्यामुळे कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आहेत. हा उपक्रम प्रत्येक शाळेत ९० ते १०० मुलांपर्यंत पोहोचला आहे. त्यासाठी मुलांना आधार कार्डद्वारे प्रवेश दिला जात आहे. मुलांना मध्यान्ह भोजन, पुस्तके, गणवेष इत्यादी गोष्टी मोफत देण्यात आले. प्रत्येक शाळेत अध्यापन करणारे पाच ते सहा शिक्षक आहेत. अध्ययनादरम्यान मुलांची गळती होऊ नये यासाठी शिक्षक स्वत:च ते राहत असलेल्या तंबूत जातात. त्यांना या आनंददायी शाळेत आणतात. मुलांना आणल्यानंतर शाळेला सुरूवात होते.


  लर्निंग कॉर्नर प्रकल्पाद्वारे प्रात्यक्षिक शिकवले जाते
  - सेक्टर-२ च्या विद्यालयाचे शिक्षक हितेश म्हणाले, कुंभात सेवा देणाऱ्या कष्टकऱ्यांचे शिबिर असलेल्या भागांतच हा उपक्रम चालवला जातो. येथे मुले प्रोजेक्टरद्वारे प्रात्यक्षिक शिकतात.
  - शिक्षिका सुषमा कुशवाहा म्हणाल्या, आम्हाला केवळ जमीन देण्यात आली होती. आम्ही येथे बागकामही केले. लहान मुलांसाठी अंगणवाडीही सुरू केली. येथे मुलांना हसत-खेळत शिकवले जाते.


  शाही स्नानात जुना आखाड्यावर बंदी असुनही नागा साधुंनी शस्त्रास्रासह केले प्रदर्शन
  प्रयागराज कुंभमेळ्यात वसंत पंचमीनिमित्त तिसऱ्या व अंतिम शाही स्नानाच्या दिवशी रविवारी दुपारी ३ पर्यंत १.५ कोटी भाविकांनी स्नानाची पर्वणी साधली. सर्वात आधी १३ आखाड्यांचे स्नान जाले. जुना आखाड्याच्या प्रदर्शनास मनाई असतानाही नागा साधूंनी शस्त्रांचे प्रदर्शन केले.


  २२ फेब्रुवारीला २०० देशांचे प्रतिनिधी येणार, संदेश मायदेशी पाठवतील
  - कुंभात २२ फेब्रुवारीला २०० देशांचे प्रतिनिधी दाखल होतील. हे प्रतिनिधी मायदेशात कुंभाचा प्रचार-प्रसार करतील व कुंभाच्या भव्यतेचा संदेश पोहोचवतील.

  -‘रामनाम’ बँक डिजिटल झाली आहे. बँकेचे प्रमुख आशुतोष वार्ष्णेय म्हणाले, माझ्या आजोबांचा वारसा पुढे नेताेय. यात रामनाम पुस्तिका जमा होते.

Trending