आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनातारण शेती कर्ज मर्यादावाढीचा राज्यात एक काेटी शेतकऱ्यांना फायदा 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रिझर्व्ह बँक अाॅफ इंडियाने गुरुवारी जाहीर केलेल्या पतधाेरण अाढाव्यामध्ये देशातील लहान अाणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी असलेली विनातारण शेती कर्जाची मर्यादा ६० हजार रुपयांंनी वाढवून ती सध्याच्या एक लाख रुपयांवरून अाता १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत नेण्याचे जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील साधारण एक काेटी शेतकऱ्यांना फायदा हाेर्इल. त्याचबराेबर शेतीतील गुंतवणूक वाढून कृषी अर्थव्यवस्था अधिक सुदृढ हाेण्याची अाशा कृषीतज्ज्ञ व्यक्त करत अाहेत. 

 

गेल्या दाेन वर्षांतील राज्याच्या कृषी पतधाेरणावर जर टाकली असता साधारण १ काेटी ४० लाख शेतकरी दरवर्षी पीक कर्ज घेतात. २०१७-१८ या हंगामासाठी १ काेटी ३६ लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले हाेते, तर २०१८-१९ या हंगामात ५ लाख ७९ हजार ४६४ काेटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात अाले. साधारण १ काेटी ४० लाख शेतकऱ्यांनी २०१८-१९ या हंगामात पीक कर्जाचा लाभ घेतला. कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी ८० टक्के शेतकरी हे एक लाखाच्या अातील कर्ज मर्यादेत हाेते. ही बाब लक्षात घेतली तर जवळपास एक काेटी शेतकऱ्यांना रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयाचा फायदा हाेणार अाहे. 

 

शेतकऱ्यांना दिलासा 
केंद्राच्या हंगामी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६ हजार रुपये जमा करण्याची घाेषणा करण्यात अाली हाेती. त्या पाठाेपाठ रिझर्व्ह बँकेने विनातारण शेती कर्ज मर्यादेत वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना माेठा दिलासा मिळण्यास मदत हाेणार अाहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी लवकर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत बँिकंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. राज्यातील शेतकऱ्यांचा या निर्णयामुळे मोठा फायदा होणार आहे. 

 

मशागत वाढून उत्पादकता वाढेल 
रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना एक प्रकारे १ लाख ६० हजार रुपयांचे कामकाज भांडवल उपलब्ध हाेणार अाहे. सध्याच्या काळात शेतीची मशागत करण्यासाठी अावश्यक असलेल्या साधनांच्या किमती मध्यंतरी वाढल्या हाेत्या. खत, पाणी, वीज, अाैषधे, मजूर या शेतीसाठी चार महत्त्वाच्या गाेष्टी असतात. परंतु किमती वाढल्यामुळे त्याचा मशागत व शेती उत्पादकतेवर परिणाम हाेते. विनातारण शेती कर्ज मर्यादा वाढल्यामुळे शेतकऱ्याची खरेदीची कुवत वाढण्यास मदत हाेईल. पर्यायाने मशागतीची कामे वेळेत हाेऊन उत्पादकतेत वाढ हाेण्यासाठी मदत हाेऊ शकेल. जे. एफ. पाटील, कृषी तज्ज्ञ


 

बातम्या आणखी आहेत...