आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Management Company Claim 1 Crore Compensation From 2 Companies For Using Prithvis Name

पृथ्वी शॉला शतकानंतर शुभेच्छा देणे पडले महागात, 1 कोटी कम्पनसेशन देण्याची नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - 18 वर्षांच्या पृथ्वी शॉने पदार्पणातच कसोटी शतक झळकावल्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. सोशल मीडियावरही अनेक फॅन्सने त्याला शतकाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पृथ्वी ट्रेंड करत होता. सगळेच त्याला शुभेच्छा देत होत्या. अनेक कंपन्यांनीही पृथ्वीला शुभेच्छा दिल्या. पण पृथ्वीला शुभेच्छा देऊन स्वीगी आणि फ्रीचार्ज कंपन्या अडचणीत आल्याचे समोर आले आहे. पृथ्वीच्या मॅनेजमेंट कंपनी बेसलाइन वेंचरने या दोन कंपन्यांना 1-1 कोटींची नोटीस पाठवली आहे. कम्पनसेशनसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 


शुभेच्छा दिल्या मग नोटिस का..? 
खरं तर हा प्रश्न साहजिकच आहे. पण या दोन कंपन्यांनी पृथ्वीच्या नावाचा वापर त्यांच्या उत्पादनाच्या बँडिंगसाठी केला आहे. अॅडव्होकेट गगन बजाड यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे कोणीही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकते. पण शुभेच्छा जर स्वतःच्या प्रोडक्टच्या ब्रँडिंगसाठी दिल्या जात असतील तर ज्या व्यक्तीच्या नावाचा वापर केला असेल तो किंवा त्याचे राइट्स असलेली कंपनी कम्पनसेशनसाठी क्लेम करू शकते. प्रत्येक सेलिब्रिटीचे अॅडव्हरटाइजमेंट राइट्सबाबत अॅग्रिमेंट असते. एखाद्या एजन्सी किंवी कंपनीशी ते अॅग्रिमेंट असते. त्यांनाच या संबंधित सेलिब्रिटीजचे अॅडव्हरटाइज करण्याचा अधिकार असतो. हे कम्पनसेशन सिव्हील कोर्टाच्या माध्यमातून मिळवता येऊ शकते. त्यासाठी भारतात ठरावीक असा कायदा नाही. कॉमन लॉद्वारे यावर नियंत्रण ठेवले जाते. 


संबंधित पेजवर केले होते ट्वीट.. 
या दोन कंपन्यांनी त्यांच्या अधिकृत ट्वीटर पेजवर केलेल्या ट्वीट्समध्ये शॉच्या नावाबरोबर क्रिएटिव्हजचा वापर केला होता. ते कायदेशीररित्या चुकीचे आहे. फ्रीचार्ज आणि स्विगी दोघांनीही ट्वीट डिलिट केले आहेत. बेसलाइनचे म्हणणे आहे की, या दोन्ही कंपन्यांनी शॉच्या नावाच्या प्रसिद्धीचा वापर केला. हे बेसलाइनच्या एक्सक्लुझिव्ह राइट्सचे उल्लंघन आहे. सोबतच ट्रेडमार्क्स अॅक्ट 1966 चेही उल्लंघन आहे. बेसलाइन व्हेंचरचे एमडी तुहीन मिश्रा यांनी हे अत्यंत निराशाजनक अशल्याचे सांगितले. अशा इतर फर्म्सच्या विरोधातही कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमूलनेही शॉच्या नावासह ट्वीट केले. 

बातम्या आणखी आहेत...