Home | Maharashtra | Pune | 1 crore floral decoration to Dagadusheth Halwai Ganapati

‘दगडूशेठ’ला १ कोटी सुवासिक फुलांची सजावट; बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी

प्रतिनिधी | Update - Apr 24, 2019, 10:41 AM IST

वासंतिक उटी माेगरा महोत्सवानिमित्त आरास, विविध प्रजातींच्या फुलांंचा समावेश

 • 1 crore floral decoration to Dagadusheth Halwai Ganapati

  पुणे - मोगऱ्याच्या फुलांची आकर्षक सजावट... त्या सुगंधाने दरवळलेला परिसर..चाफा, झेंडू, गुलाब, लिलीसारख्या फुलांनी सजलेला गाभारा आणि शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्यासाठी पुणेकरांनी मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
  वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला मोगऱ्यासह विविध प्रकारच्या तब्बल एक कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठवण्यासोबत मोबाईल कॅमेऱ्यामध्ये हे क्षण अनेकांनी टिपले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहकाऱ्यांनी गणरायाला पुष्परचना केली. ही रचना भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

  > ०२ दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी
  > ३०० महिला व २५० पुरुष कारागिरांचा सहभाग

  > १३०० किलो झेंडू , २३०० किलो मोगऱ्याचा वापर

  > चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले, गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी

Trending