आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाच्या शौचालयात सापडले सव्वा काेटीचे साेने; दुबईहून आले विमान, संशयितांचा शोध सुरू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या स्पाइस जेटच्या एका विमानाच्या शाैचालयात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणीदरम्यान तब्बल चार हजार ग्रॅम वजनाचे १ काेटी २९ लाख चार हजार रुपयांची साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी साेन्याची बिस्किटे ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संशयिताचा शाेध सुरू केला आहे.

 

गुरुवारी पहाटे चार वाजून २५ मिनिटांनी स्पाइस जेटचे हे विमान दुबईहून पुणे विमानतळावर लँड झाले. आंतरराष्ट्रीय विमान पुणे विमानतळावर आल्यानंतर त्याचा वापर देशांर्तगत विमानसेवेसाठी केला जाताे. त्यानुसार स्पाइस जेटचे विमान पुणे विमानतळावरून बंगळुरूला रवाना हाेणार हाेते. मात्र, दुबईहून येणाऱ्या विमानाच्या माध्यमातून अनेक वेळा साेन्याची तस्करी केली जात असते. त्यामुळे कस्टम विभागाचे अधिकारी, प्रवासी तसेच त्यांच्या सामानाची तपासणी करतात. तसेच विमानातील सर्व खुर्च्या, शाैचालयाची तपासणी होतेे. कस्टम विभागाचे निरीक्षक देशराज मीना हे तपासणी करत असताना त्यांना विमानाच्या शाैचालयात काळया रंगाच्या टेपमध्ये गुंडाळून ठेवलेली साेन्याची चार बिस्किटे सापडली. तसेच त्यावर परदेशी शिक्काही निदर्शनास आला.

 

बातम्या आणखी आहेत...