आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कॉर्पिओची आंब्याच्या झाडाला धडक; एक जण ठार, दोघे गंभीर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारणी - भरधाव स्कॉर्पिओ चालकाचे नियंत्रण सुटून आंब्याच्या झाडावर आदळून झालेल्या अपघातात चालक यासीन खान अय्यूब खान (वय २८) याचा मृत्यू झाला, तर चेतन मेश्राम (वय २५) व अरमान खान यासीन खान (वय ५) सर्व रा. बैरागड गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास कुटंगा ते हरदा मार्गावर घडली. अन्य तिघांवर बैरागड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


मृतक यासीन खान व चेतन मेश्राम हे दोघे मित्र आहेत. चेतन मेश्रामने नुकतीच स्कॉर्पिओ वाहन (क्रमांक एमएच २९ आर ७९७६) खरेदी केले होते. त्यामुळे यासीन खान, मुलगा अरमान खान, चेतन मेश्राम व अन्य तिघे असे बुधवारी सायंकाळच्या सुमारास या वाहनाने फिरण्यासाठी कुटंगा ते हदरा मार्गाने जात होते. यासीन खान हा वाहन चालवत होता. दरम्यान भरधाव वाहनावरचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या आंब्याच्या झाडावर आदळले. यात यासीन खानचा जागेवरच मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा अरमान व चेतन मेश्राम गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी धारणी व तेथून अमरावतीकडे हलवण्यात आले. अन्य तिघांना बैरागडच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. धारणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास धारणीचे ठाणेदार विलास कुलकर्णी व त्यांची चमू करत आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...