आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1 Lakh Coins Brought By Merchant To Pay Electricity Bill; The Electricity Board Sent Him Back

विज बिल भरण्यासाठी व्यापाऱ्याने आणली १ लाखाची नाणी; वीज मंडळाची उडाली धांदल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरबा - छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील एका कापड व्यापाऱ्याने चलाखी करत १ लाख रुपयाची नाणी वीज बिल भरण्यासाठी आणली होती. नाणी पाहून कर्मचारी गोंधळून गेले. तो व्यापारी इकडे तिकडे फिरत कर्मचाऱ्यांना वीज बिलाचे पैसे घेण्यास सांगत होता. परंतु कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला. व्यापाऱ्याने काही नोटाही आणल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी नोटाच्या रकमेइतके बिल हप्त्याच्या स्वरूपात स्वीकारण्याची तयारी दर्शवली. रक्कम भरून घेतली आणि त्यास परत पाठवले.


यासंदर्भात माहिती अशी की, पवनकुमार यांच्याकडे वीज बिलाची एक लाख रुपये थकबाकी होती. वीज मंडळाने मोठ्या थकबाकीदारांसाठी वीज बिल वसुली मोहीम सुरू केली आहे. थकबाकी न भरल्यास वीज जोडणी कापण्यात येत आहे. पवनकुमार यांच्याकडे एक लाख रुपये थकबाकी होती. त्याला बिल भरण्यास सांगितले असता, दोन पोती भरून चिल्लर नाणी आणली होती.